

Shivdeep Lande Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. या निकालाकडे महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारमधील सिंघम अशी ओळख असणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांड यावेळी निवडणूक रिंगणात उतरले होते. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघातील निकाल स्पष्ट होत असून शिवदीप लांडे ही आता पिछाडीवर पडले असून, ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांना आतापर्यंत ९,७४६ मते मिळाली आहेत.
मतमोजणीच्या १५ व्या फेरीअखेर: शिवदीप लांडे तिसऱ्या क्रमांकावर (९,७४६ मते). जेडीयूच्या नचिकेतांची ५२,७७९ मतांसह निर्णायक आघाडी, तर नरेंद्र कुमार यांना ३२,८४३ मते मिळावी आहेत.
शिवदीप लांडे यांच्यामुळे जमालपूरमधील यंदाचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले होते. सत्ताधारी जेडीयूनेधक्कातंत्राचा वापर करत माजी मंत्र्यांचे तिकीट कापून नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. तिकीट नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या माजी मंत्री अपक्ष म्हणून मैदानात उतरले. यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरली होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिवदीप लांडे यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा होती. शिवदीप हे सासरे विजय शिवतारे यांच्या पुरंदर मतदारसंघातून निवडणूक लढवतील असावा अंदाज व्यक्त होत होता. मात्र अखेर ते बिहारच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले. जमालपूर मतदारसंघात त्यांची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही चर्चा मतपेटीत रुपांतर करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यांची वाटचाल पराभवाच्या दिशेने सुरु असून या मतदार संघात जेडीयूच्या नचिकेता मंडल यांनी ५२,७७९ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.