Crime News: गुन्हेगाराशी प्रेम, सत्य समजताच केलं ब्लॉक; शेवटचं भेटायला बोलावलं अन् तरुणीला पाठलाग करून संपवलं

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Bengaluru crime news

बेंगळूर: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. रविवारी रात्री उत्तर बेंगळूरच्या महालक्ष्मी लेआउट भागात ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राजीव (वय २४, रा. लग्गेरे) याला अटक केली. मृत तरुणी अंजली (वय २३, रा. भुवनेश्वरी नगर, के.पी. अग्रहारा) आणि राजीव हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. एका कार शोरूममध्ये काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. दोन्ही कुटुंबांना त्यांच्या या संबंधांची कल्पना होती, परंतु राजीवची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजल्यानंतर अंजलीच्या पालकांनी या लग्नाला विरोध केला होता. यापूर्वी त्याच्यावर लुटालूट आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल होते.

Crime News
Beed Crime News : परळीत महिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास घरातून घेऊन जाऊन अमानुष मारहाण

मोबाईल ब्लॉक केल्याने आरोपी संतप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीवने अंजली आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नासाठी राजी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, परंतु त्याला यश आले नाही. पालकांच्या दबावामुळे अंजलीने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. तिने त्याचे फोन कॉल्स आणि मेसेजला प्रतिसाद देणेही बंद केले होते आणि त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला.

रविवारी संध्याकाळी राजीवने अंजलीला जेवणासाठी भेटायला बोलावले. भेटीदरम्यान त्याने पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला. तुझ्याशी लग्न करणार नाही, असे अंजलीने सांगितल्यानंतर या चर्चेचे रूपांतर वादात झाले. तिच्या नकाराने संतापलेल्या राजीवने अंजलीला रात्री साडे-नऊच्या सुमारास के.पी. अग्रहाराजवळील पाइपलाइन रोडवरील एका निर्जन ठिकाणी नेले. त्याने तिच्यावर चाकूने वार केले; तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या मानेवर वार केले. ती पळत असताना पाठलाग करून त्याने वार केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्याच्या कडेला तिला पडलेले पाहून लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

Crime News
Sangli news: "गावाकडची आहेस, मला तू पसंत नव्हतीस...", लग्नानंतर नवऱ्याकडून छळ; सांगलीतील धक्कादायक घटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news