Bengaluru Stampede | चेंगराचेंगरीप्रकरणी RCB संघाविरुद्ध गुन्हा

Bengaluru Stampede |कब्‍बन पार्क पोलिस स्‍टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल: इव्हेटं कपनी व कर्नाटक क्रिकेट बोर्डावरही एफआयआर दाखल
FIR Against RCB Team
चिन्नास्‍वामी स्‍टेडियम बाहेर झालेल्‍या चेंगराचेंगरीप्रकरणी आसीबी संघावर गुन्हा दाखलPudhari News Network
Published on
Updated on

FIR Against RCB Team

बंगरुळ : आयपीएल मध्ये विजयी झाल्‍यानंतर आरसीबी संघाचा विजयोत्‍सव व सत्‍कारसोहळा बुधवारी चिन्नास्‍वामी स्‍डेडियममध्ये ठेवला होता. या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीमुळे गालबोट लागले या घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याची दखल आता कर्नाटक पोलिसांनी गंभीरपणे घेतली असून RCB चा संघ, कर्नाटक स्‍टेट क्रिकेट बोर्ड व कार्यक्रमाचे आयोजन केलेली इव्हेंट कंपनी DNA एंटरटेनमेट नेटवर्क यांच्या विरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कब्‍बन पार्क पोलिस स्‍टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची दखल कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतली व त्‍यांनी कर्नाटक सरकारला या घटनेबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच सुमोटो दाखल करत कोर्टाने सरकारला १० जून पर्यंत सविस्‍तर अहवाल देण्याचेही आदेश दिले आहेत. न्यायमुर्ती व्ही कमेश्वर राव आणि न्यायाधिश सी एम जोशी यांनी ही सुमोटो दखल घेत जनहित याचिका दाखल करुन घेतली.

FIR Against RCB Team
Bengaluru Stampede | सेलिब्रेशनपेक्षा जीव महत्वाचा; थोडं शहाणपणाने हाताळा... RCB च्या विजयी मिरवणुकीतील गोंधळावर कपिल देव यांचे मत

आरसीबीने केली १० लाख देण्याची घोषणा

दरम्‍यान आरसीबीने या प्रकरणी मृत झालेल्‍या ११ व्यक्‍तिंच्या नातेवाईकांना प्रत्‍येकी १० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. याबाबात संघाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे त्‍यामध्ये त्‍यांनी मृतांना मदत जाहीर केली आहेच तसेच. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्‍या ४७ जणांचीही मदत देण्यात येणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी भादवि चे कलम १०५, १२५ , १४२ आदी कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच नटराजा शर्मा नावाच्या वकीलांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, कर्नाटक क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, व आसीबी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

FIR Against RCB Team
Bengaluru stampede| कर्नाटकच्‍या गृहमंत्र्यांनी RCB, राज्‍य क्रिकेट संघटनेवर फोडले चेंगराचेंगरीचे खापर ! नेमकं काय म्‍हणाले?

‘बंगळुर येथे काल घडलेली ही एक दुखःद घटना आहे आणि यामध्ये मृत झालेल्‍यांच्या कुंटुंबासोबत आम्‍ही सदैव राहू, तसेच आम्‍ही प्रत्‍येकी १० लाखांची मदत देत आहोत’ असे त्‍यांनी दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे. दरम्‍यान आरसीबी संघाचा विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतली. हजारो चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्‍ये 7 युवक आणि4 युवतींचा समावेश आहे. ५० जण जखमी झाले असून यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर बौरिंग आणि वैदेही या दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुर्घटनेबद्दल जनतेची माफी मागितली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news