Screengrab of over crowded Bengaluru Metro Station
Bengaluru Metro StationPudari

Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी रॅलीमुळे बेंगळुरूत खोळंबा; रस्ते जाम, मेट्रो सेवेबाबत महत्त्वाची अपडेट

Chinnaswamy Stadium Bangalore Stampede: गर्दीमुळे तीन ते चार मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय बेंगळुरू मेट्रो प्रशासनाना घ्यावा लागला आहे.
Published on

Bengaluru Stamped Metro Station Closed Know Traffic Update

बेंगळुरू : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची विजयी रॅली बेंगळुरूतील सर्वसामान्यांसाठी तापदायक ठरली. बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. इतकंच नव्हे मेट्रो सेवेवरही याचा ताण आला असून गर्दीमुळे तीन ते चार मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय बेंगळुरू मेट्रो प्रशासनाना घ्यावा लागला आहे.

बुधवारी संध्याकाळी बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे आयपीएल विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ येणार होता.  आपल्या लाडक्या खेळाडूंसोबत आनंदोत्सव साजरा करण्याच्या हेतूने बेंगळुरूतील लाखो क्रिकेट प्रेमी चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने गेले. मात्र, या आनंदोत्सवाला संध्याकाळी गालबोट लागले. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की स्टेडियमच्या एका प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली.

Screengrab of over crowded Bengaluru Metro Station
RCB IPL Champions| 'आरसीबी'ने ट्रॉफी जिकंली अन् महिलेचा घटस्फोट टळला, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

संध्याकाळी सातवाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना बेंगळुरूतील तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 'रुग्णालयात इतके जखमी आले आहेत की सध्या आम्हाला त्याची नोंद ठेवणंही शक्य होत नाहीये', अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने 'न्यू इंडियन एक्स्प्रेस' या स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या दुप्पट गर्दी मैदानाबाहेर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेवढी गर्दी स्टेडियमच्या आत होती त्याच्या दुप्पट गर्दी स्टेडियम बाहेर झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त पाच हजार पोलिस तैनात होते. तर दुसरीकडे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. ‘आमच्या पोलिसांची यात काहीही चूक नाही. आम्ही पोलिसांवर खापर फोडणार नाही. लाखो प्रेक्षक मैदानावर पोहोचल्याने ही दुर्घटना घडली’, असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांवर वाहतूक कोंडी

बेंगळुरूतील वाहतूक कोंडी ही नेहमीच देशभरात चर्चेचा विषय असते. अशा शहरात लाखो प्रेक्षक जल्लोष करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमला पोहोचल्याने वाहतूक कोंडीत भर पडली नसती तर नवलच. चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने जाणारे रस्ते जाम झाले आहेत.

Screengrab of over crowded Bengaluru Metro Station
IPL 2025 RCB Win: अँडी फ्लॉवर, डीके अण्णा ते प्रभावी गोलंदाज... या पाच कारणांमुळे आरसीबीने कप जिंकला

मेट्रो सेवेवरही परिणाम

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटडने (BMRCL) गर्दीमुळे सेंट्रल कॉलेज, एमजी रोड, विधाना सौध - Vidhana Soudha, कब्बन पार्क- Cubbon Park ही मेट्रो स्थानकं पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती दिली. प्रवाशांनी पर्यायी मेट्रो स्थानकांचा वापर करून इच्छित स्थळ गाठावे, असे आवाहन बेंगळुरू मेट्रोने केले आहे.

कब्बन पार्क हे चिन्नास्वामी स्टेडियमपासून जवळचे मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्थानकांवर गर्दी वाढली आहे. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news