Swimming Pool Tragedy : बंगळूरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकन पर्यटकासह पूल अटेंडंट जखमी
Swimming Pool Tragedy
प्रातिकात्‍मक छायाचित्र. File Photo.
Published on: 
Updated on: 

Swimming Pool Tragedy : बंगळूरु येथील एका फाईव्ह स्टार (पंचतारांकित) हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये जर्मनसह स्लोव्हाक नागरिकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) विजेचा धक्का लागल्याने ही दुर्घटना घडली. या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करताना अमेरिकन पर्यटकासह हॉटेलचा कर्मचारी जखमी झाला आहे.

स्विमिंग पूलमध्ये पोहण्‍यासाठी उतरले...

बंगळूर येथील 'कॉनराड हॉटेल'च्या स्विमिंग पूलमध्ये जर्मन नागरिक अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थिस (वय ५७) व स्लोव्हाक नागरिक आणि 'आयबीएम' कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जुराज होर्वॅट (४५) तिसऱ्या मजल्यावरील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरले होते.

Swimming Pool Tragedy
Swimming Pool Death : स्विमिंग पूलमध्ये मारलेली उडी ठरली अखेरची, कसबा सांगावच्या युवकाचा वायरी येथे डोके आपटून मृत्यू

दोघांचा मृत्‍यू, दोघे जखमी

हॉटेलमध्ये वास्तव्यास असणारे अमेरिकन पर्यटक मॅथ्यू डिसँटिस (४१) आणि हॉटेलचे पूल अटेंडंट व लाईफगार्ड राहुल तिवारी (२८) यांनी अलेक्झांडर आणि जुराज यांना वाचवण्याचा प्रयत्न केले. यामध्‍ये हे दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Swimming Pool Tragedy
First Swimming Pool World | जगातील पहिला इनडोअर स्विमिंग पूल

विजेचा धक्‍क्‍याने मृत्‍यू

या घटनेबाबत मनिपाल हॉस्पिटलच्या 'इमर्जन्सी मेडिसिन' विभागाच्या प्रमुख डॉ. मेबेल वासनैक यांनी सांगितले की, अलेक्झांडर थिस यांना रुग्णालयात आणले त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जुराज होर्वॅट यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही आणि अखेर त्यांनाही मृत घोषित करण्यात आले. विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोघांना वाचविण्यात यश

स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना डेसँटिस यांना पाण्या च्या प्रवाहात विजेचा धक्का जाणवला, त्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी परतले. त्याच वेळी, तिवारी यांनी पूलमध्ये उडी मारून अन्य दोन व्यक्तींना वाचवले. मॅथ्यू डिसँटिस आणि राहुल तिवारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.