‘NCERT’ च्या बारावीच्या पुस्तकातून ‘बाबरी मशीद’चा उल्लेख हटवला

‘NCERT’ च्या बारावीच्या पुस्तकातून ‘बाबरी मशीद’चा उल्लेख हटवला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: एनसीईआरटीच्या १२ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव काढून टाकण्यात आले आहे. आता नवीन पुस्तकात तिचे वर्णन तीन घुमट रचना असे करण्यात आले आहे. अयोध्येचा अध्याय चार पानांवरून फक्त दोन पानांचा करण्यात आला आहे. त्यात राम मंदिर उभारणीच्या संघर्षाची कहाणी आहे. सोमनाथची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, अयोध्येतील हिंसाचार यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुन्या पुस्तकात 16 व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधल्याचा उल्लेख आहे.

जुन्या पुस्तकात काय उल्लेख होता?

आता या प्रकरणात असे म्हटले आहे की 1528 मध्ये श्री राम जन्मस्थानावर तीन घुमट रचना बांधण्यात आली होती. संरचनेत अनेक हिंदू चिन्हे असल्याचा उल्लेख अध्यायात करण्यात आला होता. आतील आणि बाहेरील भिंतींवर शिल्पे होती. फैजाबाद जिल्हा न्यायालयाने मशीद उघडण्याचा निर्णय घेतल्याचे जुन्या पुस्तकातील दोन पानांमध्ये म्हटले आहे. तेव्हापासून येथे अनेक घटना घडल्या. 1992 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा काढण्यात आली होती आणि कारसेवकांमुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर 1993 मध्ये जातीय दंगली झाल्या होत्या.

नवीन पुस्तकात काय बदल?

नवीन पुस्तकात असा उल्लेख आहे की, 1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमट संरचना उघडण्याचे आदेश दिले. लोकांना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली होती. हे तीन घुमट रचना भगवान रामाच्या जन्मस्थानी बांधण्यात आली होती असा ही उल्लेख पुस्तकात आहे.

वर्तमानपत्राच्या कटिंग्जची छायाचित्रे लावली होती

अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा नव्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने ही भूमिका मंदिराची असल्याचा निकाल दिला होता, असे सांगण्यात आले. जुन्या पुस्तकात वर्तमानपत्राच्या कटिंग्जची चित्रे लावली होती. यामध्ये बाबरी विध्वंसानंतरचे कल्याण सिंह सरकार हटवण्याच्या आदेशाचा समावेश होता. तो आता काढण्यात आला आहे. 2014 नंतर NCERT चे पुस्तक बदलण्याची ही चौथी वेळ आहे. एप्रिलमध्ये एनसीईआरटीने म्हटले होते की ताज्या घडामोडींच्या आधारे अध्यायात बदल करण्यात आले आहेत. त्यात नवीन माहिती समाविष्ट केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news