Baba Ramdev : मला पुन्हा आंदोलन करावे लागू नये, बाबा रामदेव असे का म्हणाले?

योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारी नोकऱ्यांमधील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Baba Ramdev
Baba Ramdev : मला पुन्हा आंदोलन करावे लागू नये, बाबा रामदेव असे का म्हणाले?file photo
Published on
Updated on

baba ramdev warns of movement over alleged scams in government jobs

पुढारी ऑनलाईन : योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारी नोकऱ्यांमधील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर आपल्याला पुन्हा आंदोलन करावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Baba Ramdev
Rahul Gandhi : राहुल गांधींवर होणार मोठी कारवाई? हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले, नोटीसही बजावली

योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारी भरती प्रक्रियेतील कथित घोटाळ्यांवरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतात. आपल्या जाती, वर्ग किंवा संघटनेतील लोकांना फायदा करून देत इतर उमेदवारांना डावलले जाते, असा आरोप त्यांनी केला.

भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप

८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी भरती प्रक्रियेवर भाष्य केले. मुलाखतीदरम्यान लाचखोरी आणि शिफारशींच्या तक्रारी समोर येतात, असा दावा त्यांनी केला. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Baba Ramdev
योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांचे केले कौतुक, म्हणाले, “मला आश्चर्य वाटले की...”

व्यवस्थेत सुधारणा झाली नाही, तर आपल्याला आंदोलन करावे लागू शकते, असे त्यांनी म्हटले. मात्र, आपण अराजकता किंवा आंदोलनाचे समर्थक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

'सरकारी नोकरीतील मुलाखतीत ९०-९९ टक्के घोटाळा'

बाबा रामदेव म्हणाले, “देशात चारही बाजूंनी गोंधळाचे वातावरण आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी वीज, पाणी आणि पुस्तकांची सुविधा नसल्याची तक्रार करत आहेत. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही दहावी-बारावीचे गुण अनेक ठिकाणी ग्राह्य धरले जात नाहीत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवड केली जाते. सरकारी नोकरीच्या मुलाखतीदरम्यान ९० ते ९९ टक्के घोटाळा होतो. आपल्या संघटनेतील, जातीतील किंवा वर्गातील लोकांना संधी दिली जाते आणि इतरांना बाहेर केले जाते. हे न्यायाच्या विरोधात आहे. मुलाखतीमध्ये पैसे घेऊन आणि लाच घेऊन भरती केली जाते. हे सुधारले नाही तर देशात आंदोलन होईल.”

ते पुढे म्हणाले की, “मी आंदोलन किंवा अराजकतेचा समर्थक नाही. मात्र देशात मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. हे सर्व सुधारले पाहिजे. अन्यथा अशी वेळ येऊ नये की बाबा रामदेव यांना आंदोलन करावे लागेल.”

राजकारण्यांनाही दिला सल्ला

बाबा रामदेव यांनी राजकारण्यांनाही एकमेकांशी भांडण्याऐवजी देशहितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. राजकारण्यांनी आपापसात संघर्ष करू नये, असे ते म्हणाले.

त्यांनी पाकिस्तान आणि परकीय शक्तींचा संदर्भ देत सांगितले की, “लढण्यासाठी पाकिस्तान आणि परकीय शक्ती आहेत, आपण आपसात लढू नये.” देशात एकमेकांबद्दल द्वेषाची भावना ठेवणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. देशात जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुकही केले पाहिजे, असे आवाहन बाबा रामदेव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news