माफिया अतिक अहमदच्या मालमत्तेवर कारवाई! 50 कोटींची बेनामी मालमत्ता सरकारकडे हस्तांतरित

अवैध कामातून कमावलेल्या पैशाने अतिकने ही जमीन खरेदी केली होती
माफिया अतिक अहमदच्या मालमत्तेवर कारवाई! 50 कोटींची बेनामी मालमत्ता सरकारकडे हस्तांतरित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Atiq Ahmed Property : गँगस्टरचा राजकारणी बनलेल्या अतिक अहमदची गेल्या वर्षी 15 एप्रिल रोजी हत्या झाली होती. त्याच्या हत्येला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आता अतिकची 50 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उत्तर प्रदेश सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. अवैध कामातून कमावलेल्या पैशाने अतिकने ही जमीन खरेदी केली होती.

जिल्हा सरकारी अधिवक्ता (गुलाब चंद्र अग्रहरी) यांनी सांगितले की, अतिक अहमदने अवैध कामातून मिळालेल्या पैशाने राज मिस्त्री हुबलाल या नावे 2.377 हेक्टर जमीन खरेदी केली होती. हा व्यवहार करताना अतिकने गरज पडल्यास जमिनीची नोंदणी आपल्या नावावर करू, असे सांगितले होते. त्यावेळी या जमिनीची किंमत 12.42 कोटी रुपये प्रति हेक्टर होती. (Atiq Ahmed Property)

अग्रहरी यांनी सांगितले की, ही मालमत्ता पोलिस आयुक्त न्यायालयाने गँगस्टर कायद्याच्या कलम 14 (1) अन्वये जप्त केली होती. त्यानंतर जमीन खरेदीबाबत पुरावे देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पण संबंधित पक्षाच्या वतीने जमिनीच्या मालकीचा कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही. त्यानंतर पोलीस आयुक्त न्यायालयाने या प्रकरणाची फाईल प्रयागराज गँगस्टर कोर्टात पाठवली. मंगळवारी न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांनी पोलीस आयुक्तांची कारवाई योग्य आणि न्याय्य असल्याचे म्हटले आणि जप्त केलेली मालमत्त राज्य सरकारच्या नावे केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक अहमदविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुबलालच्या नावावर मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत हुबलालने सांगितले की, अतिकने 2015 मध्ये धमकी देऊन ही जमीन बळकावली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये पोलिसांनी ही जमीन ताब्यात घेतली होती.

अतिक अहमदची हत्या कधी झाली?

गेल्या वर्षी 15 एप्रिलला अतिक अहमदची हत्या झाली होती. उमेश पाल याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटकत केली होती. प्रयागराजमध्ये 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता पोलीस अतिक आणि त्याच्या भावाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी या तीन हल्लेखोरांनी दोन्ही भावांना गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा मृतू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news