प्रकृती बिघडल्याची माहिती निराधार : रतन टाटा

वयानुसार करण्‍यात आल्‍या आवश्‍यक वैद्यकीय तपासणी
प्रकृती बिघडल्याची माहिती निराधार : रतन टाटा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांबद्दल मला माहिती आहे. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशा शब्‍दांमध्‍ये टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती निराधार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे यापूर्वीचे वृत्त आले होते. असा दावा करण्यात आला की त्यांचा रक्तदाब अचानक लक्षणीयरीत्या कमी झाल्‍याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. मात्र, काही काळानंतर रतन टाटा यांनी स्‍वत:च X वर पाेस्‍ट करत ही माहिती निराधार असल्याचं म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news