Hall of Shame : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची आता जाहीर नाचक्की! LED स्क्रीनवर दाखवला जाणार व्हिडिओ

एका नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी घाण करणारे आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'हॉल ऑफ शेम' ही मोहीम सुरू केली आहे.
Hall of Shame campaign
Hall of Shame : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची आता जाहीर नाचक्की! LED स्क्रीनवर दाखवला जाणार व्हिडिओfile photo
Published on
Updated on

assam tinsukia hall of shame cleanliness campaign screens public littering urination offenders

पुढारी ऑनलाईन : स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छतेसंबंधी जागरूकता केली तरी नागरिकांकडून त्‍याचे पालन होतेच असे नाही. अनेक लोकांकडून उघड्यावरच लघुशंका करणे किंवा थुकणे यासारखे प्रकार केले जातात. यामुळे परिसरात अस्वच्छता रोगराई पसरण्याची भीती असते. त्‍यामुळे अशा लोकांना सरळ करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठे पाउल उचलले आहे.

Hall of Shame campaign
Death Registration Data | गरज आमूलाग्र सुधारणांची समाजभान

आसाममधील तिनसुकिया नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी घाण करणारे आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'हॉल ऑफ शेम' ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत नियम मोडणाऱ्यांचे व्हिडिओ शहरातील मोठ्या डिजिटल LED स्क्रीनवर दाखवले जात आहेत. नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

तिनसुकिया शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक नगरपालिकेने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी 'हॉल ऑफ शेम' अभियान सुरू करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचे कृत्य रस्त्यांवरील मोठ्या LED स्क्रीनवर सर्वांसमोर दाखवले जात आहे. यासाठी संपूर्ण शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Hall of Shame campaign
Shocking Video : अजगराच्या उशीवर पहुडली चिमुकली..घरचे व्हिडीओ बनवण्यात मश्गुल.. VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

CCTV च्या मदतीने रस्त्यावर, भिंतीलगत कचरा टाकणारे किंवा उघड्यावर लघुशंका करणारे नागरिक ओळखले जात आहेत. कॅमेऱ्यात कैद झालेले हे व्हिडिओ शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डिजिटल स्क्रीनवर प्रसारित केले जात आहेत, जेणेकरून सर्व नागरिकांना ते पाहता येतील.

नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा उद्देश

तिनसुकिया नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे हा आहे. वारंवार जनजागृती करून आणि दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिकरीत्या व्हिडिओ दाखवला जाईल या भीतीमुळे नागरिक उघड्यावर घाण करणे टाळतील आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करतील, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

प्रशासनाच्या या डिजिटल 'हॉल ऑफ शेम' मोहिमेवर सोशल मीडिया आणि नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हा प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपाय असल्याचे म्हटले आहे.

मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे हे व्यक्तीच्या गोपनीयतेच्या (Privacy) अधिकाराचे उल्लंघन ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news