Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री निवासस्थान सोडले

जाणून घ्या केजरीवालांचा नवा पत्ता काय असणार?
Arvind Kejriwal
केजरीवालांनी सोडले मुख्यमंत्री निवासPudhari News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (दि.४) मुख्यमंत्री निवासस्थान सोडले. आता ते आपल्या कुटुंबासह नवी दिल्लीमधील एका नवीन ठिकाणी राहायला गेले आहेत. जाणून घेऊया... दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नवीन घराचा पत्ता काय असणार?

केजरीवाल कुटुंबासह नवी दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातील फिरोजशाह रस्ता बंगला क्रमांक ५ येथे राहण्यासाठी गेले आहेत. हे निवासस्थान आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांना केंद्र सरकारकडून देण्यात आलेला बंगला आहे. तत्पूर्वी, केजरीवालांसह त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री निवास्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रेमळ निरोप दिला, याप्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांना मिठी मारली. दरम्यान त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी निवासस्थानाच्या चाव्या एका अधिकाऱ्याला दिल्या.

यानंतर AAP ने एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, "अरविंद केजरीवाल जोपर्यंत जनता दरबारात त्यांच्या प्रामाणिकपणाची पुष्टी करत नाहीत आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहणार नाहीत". अरविंद केजरीवाल यांचा नवा पत्ता सध्या 5, फिरोजशाह रोड असा असणार आहे. त्यानंतर ते शुक्रवारपासून आपचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी राहणार आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात त्यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांना टिळक लेनमध्ये घर देण्यात आले होते. यानंतर ते सिव्हिल लाईन्समध्ये स्थलांतरित झाले.

गुरुवारी (दि.४) आप मुख्यालयात दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले होते की, केजरीवाल शुक्रवारी अधिकृत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करतील. अनेक खासदार, आमदार आणि मंत्र्यांसह दिल्लीतील समर्थकांनी त्यांना त्यांच्या घरी राहण्याची ऑफर दिली होती, परंतु केजरीवाल यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी त्यांना येथून निवडून दिले होते. ते आता अशोक मित्तल यांच्या ५, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहणार आहेत. केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा कोणताही दबाव नव्हता, मात्र त्यांनी वैयक्तिक निर्णय म्हणून राजीनामा दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news