

दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिचा शुक्रवारी १८ एप्रिलला थाटामाटात विवाह सोहा पार पडला. सोहळ्यात केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता यांनी 'पुष्पा-२' चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला. पुष्पा-२ चित्रपटातील "अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी,..." या गाण्यावर लेकीच्या लग्नात केलेला अरविंद केजरीवाल आणि पत्नी सुनीता यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या कन्या हर्षिता केजरीवाल यांचा विवाह १८ एप्रिल २०२५ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक कपूरथला हाऊस येथे पारंपरिक पद्धतीने पार पडला. या विवाह सोहळ्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. विवाहाच्या आदल्या दिवशी, १७ एप्रिल रोजी, दिल्लीतील शांग्री-ला हॉटेलमध्ये एंगेजमेंट सेरेमनी झाली. या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता यांनी 'पुष्पा' चित्रपटातील गाण्यावर नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला दिल्ली आणि पंजाबमधील आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग, राघव चड्डा यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते
अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांची मुलगी हर्षिता यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, नोएडा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्ली येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी Boston Consulting Group मध्ये असोसिएट कन्सल्टंट म्हणूनही काम केले आहे. सध्या त्या 'बेसिल हेल्थ' या हेल्थटेक स्टार्टअपच्या सह-संस्थापक आहेत. त्यांचे पती संभव जैन हे हर्षिता यांचे आयआयटी दिल्लीतील सहपाठी होते. ते सध्या 'बेसिल हेल्थ' या स्टार्टअपचे सह-संस्थापक देखील आहेत.