Arunachal Pradesh Politics : अरुणाचलमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपने नेमले दोन निरीक्षक

Arunachal Pradesh Politics : अरुणाचलमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपने नेमले दोन निरीक्षक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Arunachal Pradesh Politics : अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्री पदावरील नेत्याची निवड करण्यासाठी भाजपच्या सांसदीय मंडळाने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार तरुण चूघ यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. भाजपने नेमलेले दोन्ही निरीक्षक विधिमंडळ नेत्याची निवड करणार आहे.

नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील साठ विधानसभेच्या जागांपैकी भाजपने 46 जागा जिंकल्या. तर नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच जागा जिंकल्या. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) तीन, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने दोन, काँग्रेसने एक आणि अपक्षांनी तीन जागा जिंकल्या.

तत्पूर्वी, प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप अरुणाचल प्रदेशचे प्रमुख बियुराम वाहगे म्हणाले की, 'मुख्यमंत्री पेमा खांडू आणि इतर आमदार आणि भाजप नेते केंद्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी (नवी दिल्ली) गेले होते. ते अजून परत आलेले नाहीत. आम्ही वरीष्ठांच्या निर्णयाची वाट पाहत आहे. नवीन आमदारांसह विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड होताच शपथविधीची तयारी सुरू केली जाईल. सध्या कोणतीही तारीख ठरलेली नाही.'

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कैवल्य परानायक यांनी 2 जून रोजी विधानसभा विसर्जित केली होती आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांना नवीन सरकार येईपर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहण्यास सांगितले होते.

लोकसभेतही भाजपची उत्कृष्ट कामगिरी

अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. अरुणाचल प्रदेशमधून चार वेळा लोकसभा सदस्य राहिलेल्या किरेन रिजिजू यांची मोदी 3.0 मंत्रिमंडळात संसदीय कामकाज मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news