२० रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटकेचे आदेश

तब्बल ३४ वर्षे पोलिसांना चकवा
corruption
२० रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटकेचे आदेशFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाच घेणे हा फौजदारी गुन्हा आहे. आपल्या आजु-बाजुला लाच प्रकरणाच्या बऱ्याच घटना बघत असतो. बिहारच्या भागलपूरमधून एक विचित्र लाच प्रकरण समोर येत आहे. हे प्रकरण आहे ३४ वर्षांपूर्वीचे आणि लाच घेतली होती २० रुपये. ही लाच घेतली होती एका माजी हवालदाराने. न्यायालयाने हवालदाराला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

घेतली २० रुपयांची लाच आणि...

माहितीनुसार, बिहारमधील बराहिया येथील हवालदार सुरेश प्रसाद सिंह सहरसा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर होता. सिंह यांने ६ मे १९९० रोजी महेशखुंट येथील रहिवासी असलेल्या सीता देवी या स्टेशन प्लॅटफॉर्मवर भाजी घेऊन जात असताना थांबवले. सिंह यांने देवी यांच्याकडून पैश्यांची मागणी केली. यावेळी देवी यांनी त्याला २० रुपये दिले. ते पैसे त्याने आपल्या खिशात ठेवले. पण त्याच्यावर  बारीक लक्ष ठेवून असलेल्या तत्कालीन रेल्वे स्थानक प्रभारींनी त्याला रंगेहात पकडले आणि लाचेची रक्कम तात्काळ जप्त करण्यात आली.

तब्बल ३४ वर्षे फरार

दरम्यान सिंंह याच्यावर तीन दशकांहून अधिक काळ  कायदेशीर कार्यवाही चालली. सिंह याला रंगेहात पकडल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तो न्यायालयात हजर राहू शकला नाही. त्यानंतर तो १९९९ पासून फरार होता. त्याचा जामीन बॉण्ड रद्द करण्यात आला. अटक वॉरंट जारी करण्यात आले. मालमत्ता जप्तीचा आदेश जारी केले तरीही सिंह यांने शोधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. नुकतेच त्याने सर्व्हिस रेकॉर्डच्या तपासणीत महेशखुंट येथे खोटा पत्ता दिल्याचे उघड झाले, तर त्याचे खरे वास्तव्य लखीसराय जिल्ह्यातील बराहिया येथील बिजॉय गावात होते.

२० रुपयांसाठी जाणार तुरुंगात

आता, विशेष दक्षता न्यायाधीश सुदेश श्रीवास्तव यांच्या नवीन निर्देशांसह, बिहार पोलिसांच्या डीजीपींना सिंग याच्या अटकेची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस दलातील भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुक याबद्दल त्याला अटकेचे आदेश दिले आहेत. आता या हवलदाराला २० रुपयांसाठी तुरुंगात जावे लागणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news