जम्मू-काश्मीर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. भारतीय गुप्तचर संस्थानी जम्मू-काश्मीरमधील १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मदतनीस म्हणून काम करतात तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा आणि रसद देखील पुरवतात.
काश्मीरच्या खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोक आणि संताप आहे. दरम्यान, भारतीय गुप्तचर संस्थांनी जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कट्टर समर्थक आहेत. ते स्थानिक पातळीवर केवळ पाठिंबा आणि रसद पुरवत नाहीत तर दहशतवाद्यांना आश्रय आणि साधन सामुग्री देखील पुरवतात.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गुप्तचर संघटनांनी फरार दहशतवाद्यांची एक यादी तयार केली आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद्यांचा सरकारकडून सुफडासाफ केला जाणार आहे. दरम्यान सुरक्षा दलाने मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, दहशतवादांची घरेही उद्ध्वस्त केली आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणताही दहशतवादी वाचणार नाही. एकतर दहशतवादी ठार मारले जातील किंवा त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा पूर्णपणे नायनाट केला जाईल. सध्या १४ स्थानिक दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे चक्र वेगाने फिरत आहे आणि त्यांच्यावर एकामागून एक कठोर कारवाया सुरू आहेत.
सर्वात पहिला स्थानिक दहशतवाद्यांना मारले जाईल. या दहशतवाद्यांचा एक एक करून खात्मा केला जात आहे. यासोबतच त्यांच्या घरांवरही मोठी कारवाई होईल आणि ती सुरूही झाली आहे. शनिवारी पुलवामा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरे आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली.
दहशतवादी क्रमांक - १, आदिल रहमान देंतू — लष्कर-ए-तैयबाचा सोपोर कमांडर. २०२१ पासून सक्रिय. तपास यंत्रणांचा रडारवर आहे. त्याला मारण्याची किंवा त्याचे घर उद्ध्वस्त करण्याची योजना.
दहशतवादी क्रमांक - २, आसिफ अहमद शेख — जैश-ए-मोहम्मदचा अवंतीपुरा जिल्हा कमांडर. २०२२ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय.
दहशतवादी क्रमांक - ३, एहसान अहमद शेख — पुलवामामध्ये सक्रिय लष्कर दहशतवादी. २०२३ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी. लवकरच कारवाईची शक्यता.
दहशतवादी क्रमांक - ४, हरीश नजीर — पुलवामातील सक्रिय लष्कर दहशतवादी. सुरक्षा दलांच्या रडारवर.
दहशतवादी क्रमांक - ५, आमिर नाजिर वानी — पुलवामातील सक्रिय लष्कर-ए-तैयबा दहशतवादी. टारगेटवर आहे.
दहशतवादी क्रमांक - ६, यावर अहमद भट्ट — पुलवामामध्ये सक्रिय जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी.
दहशतवादी क्रमांक - ७, असिफ अहमद कंडे — शोपियामधील हिज्बुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतो.
दहशतवादी क्रमांक - ८, नसीर अहमद वानी — शोपियामधील लष्करचा सक्रिय दहशतवादी. परकीय दहशतवाद्यांना मदत करतो.
दहशतवादी क्रमांक - ९, शाहिद अहमद कुटे — शोपियामधील लष्कर आणि टीआरएफचा मोठा दहशतवादी. २०२३ पासून सक्रिय.
दहशतवादी क्रमांक - १०, आमिर अहमद डार — शोपियामधील लष्कर व टीआरएफसोबत सक्रिय. विदेशी दहशतवाद्यांचा मदतनीस.
दहशतवादी क्रमांक - ११, अदनान सफी डार — शोपियामधील सक्रिय दहशतवादी. लष्कर आणि टीआरएफसोबत काम करतो. पाक हँडलर्सची माहिती पोहोचवतो.
दहशतवादी क्रमांक - १२, जुबेर अहमद वानी — हिज्बुलचा अनंतनाग ऑपरेशनल कमांडर. २०१८ पासून सक्रिय. सुरक्षादलांवर हल्ल्यांमध्ये सहभागी.
दहशतवादी क्रमांक - १३, हारून रशीद गनी — अनंतनागमधील हिज्बुलचा सक्रिय दहशतवादी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले.
दहशतवादी क्रमांक - १४, जुबेर अहमद गनी — कुलगाममधील मोठा लष्कर दहशतवादी. सुरक्षादलांवर हल्ले व टारगेट किलिंगमध्ये सक्रिय.