Crime News: तू माझी नाहीस, तर कुणाचीच नाही! लग्नास नकार दिल्याने थेट तिच्या घरात गेला अन् गळा चिरला; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागतून एका १९ वर्षीय तरुणाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केली.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

तिरुपती: लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागतून एका १९ वर्षीय तरुणाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात खजिपेट तालुक्यातील अग्रहारम येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. वेंकटेश (वय १९) असे त्याचे नाव आहे.

आई-वडील सांगतील त्याच्याशीच लग्न करणार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनेय कोट्टला गावातील रहिवासी असलेला वेंकटेश हा गेल्या काही दिवसांपासून मृत अल्पवयीन मुलीचा छळ करत होता. तो तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकायचा. मात्र, 'मी केवळ माझ्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करेन', असे मुलीने त्याला सांगितले होते. असे असतानाही त्याने तिचा पाठलाग करणे आणि त्रास देणे थांबवले नव्हते.

Crime News
Goa Murder Suicide Case | डिचोलीत काळजाचा थरकाप! अभ्यासाच्या वादातून पित्याने 14 वर्षीय मुलाचा गळा आवळला, नंतर स्वतःही संपवलं

शुक्रवारी सकाळी मुलीचे आई-वडील बाहेर गेले होते, तेव्हा मुलगी घरात एकटीच असल्याने वेंकटेशने तिच्या घरी गेला. त्यावेळी पुन्हा लग्नाच्या विषयावरून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या वेंकटेशने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा चिरला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले, तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. गंभीर जखमी झालेल्या मुलीला रूग्णालयात नेत असतानाच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.

खजिपेट पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वेंकटेशला काही तासांतच ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आणि विविध महिला संघटनांनी खजिपेट येथे निदर्शने करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Crime News
नातेसंबंधाला काळिमा! १५ वर्षीय मुलाकडून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; परिसरात संतापाची लाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news