

Anant Ambani- Radhika Merchant
पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी रविवारी हरिद्वारला पोहचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राधिका मर्चंट होत्या. तसेच काही जवळचे मित्रही त्यांच्या बरोबर होते. त्यांनी ‘हर की पौडी’ याठिकाणच्या ब्रह्मकुंड येथे गंगामातेची विधवत पुजा - अर्चना केली. देशातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांचा मुलगा व सून येथे येणार असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती.
अनंत अंबानी हे खूप धार्मिक वृत्तीचे आहेत. अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. आज त्यांनी हरीद्वार येथे पत्नी राधिका हिच्यासोबत गंगेचे पूजन व आरती केली. पूजाऱ्यांकरवी त्यांनी गंगेला दुग्धाभिषेक केला.
यावेळी पूजा झाल्यानंतर अनंत हे गंगा सभा कार्यालयात पोहचले. यांनी त्याठिकाणी व्हिजीटर बुकमध्ये आपला अभिप्राय नोंदवला. हर की पौडी येथे येऊन सुखाची अनुभूती मिळाली. माता गंगेचा आशिर्वाद त्यांच्या कुटुंबावर व आपल्या भारत देशावर कायम राहो. तसेच याठिकाणच्या व्यवस्थेचेही कौतुक केले.
अनंत व राधिका यांनी गंगेचे पूजन केल्यानंतर त्यांना गंगा सभेच्यावतीने गंगा चुनरी व गंगाजलच प्रसाद म्हणून देण्यात आले. यावेळी गंगा सभेचे अध्यक्ष नितिन गौतम म्हणाले की अनंत अंबानी आज त्यांच्या पत्नीसोबत आज याठिकाणी आले. त्यांनी पूर्ण भारतासाठी प्रार्थना केली आहे. भारत शक्तिशाली व समृद्व बनावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
गंगा सभेचे महामंत्री तन्मय वशिष्ठ यांनी सांगितले की अनंत व राधिका यांनी आज माता गंगेचा अशीर्वाद घेतला. ब्रह्मकुंड वर पूजा अर्चना केली. ते भारतातील सर्वात मोठे उद्योगपती असूनही ते वर्तमानमध्ये सनातन धर्माचे रक्षक व ध्वजवाहक बनले आहे. ते धार्मिक असून देशभरातील विविध धर्मस्थळांना भेट देत असतात. ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.