'सीबीआय'च्‍या रडारवर असणार्‍या ईडी अधिकार्‍याने जीवन संपवले

५० लाखांच्‍या लाच प्रकरणी झाली होती दाेनवेळा चौकशी
ED officer
Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ५० लाख रुपयांच्‍या लाचप्रकरणी सीबीआयने दोनवेळा चौकशी केलेले 'ईइी'चे अधिकारी आलोक कुमार रंजन यांनी आपलं जीवन संपवलं. मंगळवारी (दि.२०) त्‍यांचा मृतदेह दिल्लीजवळील साहिबााबादमध्ये रेल्वे रुळावर आढळून आला.

ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांनी आर्थिक व्‍यवहार प्रकरणी एका ज्‍वेलर्सला अटक न करण्‍यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी सीबीआयने संदीप सिंग यांना दिल्लीत 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. संदीप सिंग यांना निलंबितही करण्‍यात आले आहे. या प्रकरणात आलोक कुमार रंजन यांचे नाव समोर आले. नुकतीच कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली होती; परंतु पुराव्याअभावी त्‍यांची निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली होती.

गाझियाबादचे रहिवासी असलेले आलोक कुमार नवी दिल्लीत ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. तत्‍पूर्वीते आयकर विभागात कार्यरत होते. अलोक कुमार रंजन यांनी जीवन का संपवलं याचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झाले नसल्‍याचे पोलिसांनी म्‍हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news