

पुढारी ऑनलाईन डेस्क: आसाममधील उदलगुरीमध्ये आज (दि.१३) ४.६ रिश्टर स्केल भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे आसामसह शेजारील देश भूतानच्या अनेक भागांना हादरे जाणवले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील उदलगुरीजवळ 15 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे स्थानावर 26.73° उत्तर अक्षांश आणि 92.31° पूर्व रेखांश होते. आसाममधील ढेकियाजिली, तवांग, बारपेटा, गोलपारा, उत्तर लखीमपूर, इटानगर, जोरहाट, तेजपूर, गोलाघाट, गुवाहाटी, नागाव आणि दिमापूरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.