Amarnath Yatra 2023 : भाविकांची संख्या कमी झाल्याने अमरनाथ यात्रा २३ ऑगस्टपासून तात्पुरती स्थगित

Amarnath Yatra
Amarnath Yatra

पुढारी ऑनलाईन : अमरनाथ यात्रेतील भाविकांची संख्या कमी झाल्याने २३ ऑगस्टपासून अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रविवारी अधिकृत निवेदनात श्राइन बोर्डाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात्रेतील भाविकांची संख्या लक्षणीय प्रमाणाक कमी झाली आहे. तसेच यात्रेच्या रस्त्याची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे संवेदनशील भागांवर तातडीने दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे.

1 जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत ४.४ लाखांहून अधिक भाविकांनी अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटरच्या पारंपरिक पहलगाम मार्गाने आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटरच्या बालटाल मार्गाने बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गापासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ मंदिरातील नैसर्गिकरित्या तयार झालेले बर्फाचे शिवलिंग वितळल्याने २३ जुलैपासून भाविकांच्या संख्येत घट होऊ लागली. दरम्यान, येथील भगवती नगर बेस कॅम्प येथून रविवारी ३६२ भाविकांची नवीन तुकडी ११ वाहनांतून मंदिराकडे रवाना (Amarnath Yatra) झाली आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Amarnath Yatra 2023 : काय आहे अमरनाथ यात्रेचे महात्म्य

गुहेत तयार होणार्‍या शिवलिंगाचे भाविकांना मोठे आकर्षण असते. या गुहेत शिवलिंगाबरोबरच दोन लहान बर्फाची पिंड तयार होते आणि त्यास पार्वती आणि श्री गणेश याचे प्रतीक मानले गेले आहे. गुहेच्या छताला असलेल्या एका भेगातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबापासून शिवलिंग नैसर्गिक रूपाने तयार होते. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे चंद्राच्या प्रकाशाच्या आधारावर वाढते आणि कमी होते. अशा प्रकारचे जगातील एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. अमरनाथ यात्रेत भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जात आहे. वास्तविक दरवर्षीच भाविकांच्या संख्येनुसार तयारी करण्यात येते. परंतु यावर्षी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: तयारीचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news