CCTV Camera Privacy: तुमचाही सीसीटीव्ही शेजाऱ्यांच्या घराच्या दिशेला आहे का? सावधान! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शेजाऱ्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होईल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.
Allahabad High Court
Allahabad High Courtfile photo
Published on: 
Updated on: 

CCTV Camera Privacy:

प्रयागराज : शेजाऱ्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होईल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

कोणत्याही व्यक्तीला आपल्या शेजाऱ्याच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती अजित कुमार आणि न्यायमूर्ती गरिमा प्रसाद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

Allahabad High Court
High Court: 'फक्त वैवाहिक वाद म्हणजे गर्भपाताचे कारण नव्हे'; २४ आठवड्यांच्या गर्भपाताची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

याचिकाकर्ते योगेंद्र मौर्य यांनी शेजाऱ्याने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित कॅमेरा त्यांच्या घरात येण्या-जाण्याच्या मार्गावर केंद्रित असल्याने घरात येणारे पाहुणे आणि कुटुंबीयांच्या खासगीपणाचा भंग होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा प्रकार गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले होते.

याचिकेवर निकाल देताना, न्यायालयाने याचिकाकर्त्याला या विषयाबाबत संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे औपचारिक अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने असेही आदेश दिले की, जर असा अर्ज दाखल केला गेला, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यावर विचार करून एका महिन्याच्या आत कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी.

Allahabad High Court
High Court: पत्नीवर विवाहबाह्य संबंध स्वीकारण्यासाठी दबाव आणणे म्हणजे मानसिक छळ : उच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.