कोणत्या पाठ्यपुस्तकांत बदल?; CBSE ने दिली महत्त्वाची माहिती

शाळांना केली सूचना
CBSE
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता तिसरी आणि सहावी व्यतिरिक्त इतर सर्व वर्गांच्या विद्यमान अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मागील शैक्षणिक वर्ष (२०२३-२४) प्रमाणेच या वर्गांसाठी आहेत तीच पाठ्यपुस्तके वापरणे सुरू ठेवण्याची सूचना सीबीएसईने शाळांना पुन्हा एकदा केली आहे.

CBSE
वर्षातून दोनवेळा होणार CBSE बोर्ड परीक्षा, काय आहे नवीन योजना?

केवळ इयत्ता तिसरी आणि सहावीमधील विद्यार्थ्यांनाच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन पाठ्यपुस्तके मिळतील, असे सीबीएसईने याआधी २२ मार्च रोजी मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना पाठवलेल्या परिपत्रकातून पुष्टी केली होती. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) द्वारे ही नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.

काय म्हटले आहे परिपत्रकात?

पण पाठ्यपुस्तकांबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी सीबीएसईने २२ मार्च रोजीच्या परिपत्रकाचा संदर्भ देत इयत्ता तिसरी आणि सहावी व्यतिरिक्त इतर सर्व वर्गांच्या विद्यमान अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

CBSE
CBSE | दहावी, बारावीच्या निकालाच्या टक्क्यात वाढ..!

एनसीईआरटीने चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गांसाठी नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्याची योजना आखली होती. पण त्यानंतर CBSE ने परिपत्रक जारी करत स्पष्ट केले की चालू शैक्षणिक वर्षासाठी इतर वर्गांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

हल्लीच CBSE ने इयत्ता ९ ते १२ च्या अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या महत्त्वावर जोर दिला होता. ज्यात शैक्षणिक कंटेंट, परीक्षा अभ्यासक्रम, शिकण्याचा प्रतिसाद, शैक्षणिक पद्धती आणि मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news