

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठात चर्चेत आले. कारण बॉम्बस्फोटप्रकरणी एका काश्मिरी डॉक्टरला फरिदाबादमध्ये अटक करण्यात आले होते. तो अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित होता.
Al-Falah University Chairman Arrested
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अल-फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष जावेद अहमद सिद्दीकी याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 'विद्यापीठ अनुदान आयोगा'ने (UGC) दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जाणून घेवूया नेमकं काय आहे प्रकरण...
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठात चर्चेत आले. कारण बॉम्बस्फोटप्रकरणी एका काश्मिरी डॉक्टरला फरिदाबादमध्ये अटक करण्यात आले होते. त्याच्याकडून अंदाजे ३६० किलोग्रॅम स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली. हा डॉक्टर अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित होता. स्फोटानंतर विद्यापीठाच्या कामकाजात अनियमितता आणि बनावटगिरी झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापनात कागदपत्रांची फेरफार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला. तपासादरम्यान उघड झालेल्या तथ्यांच्या आधारे, गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत पुढील कारवाई केली.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात आधीच स्वतःची कार्यवाही सुरू केली आहे. ईडीच्या तपासानंतर, दिल्ली पोलिसांनी सिद्दीकी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर जावेद अहमद सिद्दीकीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने प्रकरणाच्या इतर पैलूंचा सखोल तपास करण्यासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.