Airbus First India Made Helicopter: भारताला मिळणार पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर; सिव्हिल डिफेन्स एव्हिएशनमध्ये क्रांती!

Airbus First India Made Helicopter
Airbus First India Made HelicopterPudhari Photo
Published on
Updated on

Airbus First India Made Helicopter: भारतात नवीन प्रोडक्शन लाईन मिळाल्यानंतर आता एव्हिएशन जगतातील मोठी कंपनी एअरबस उत्तुंग भरारी घेण्याची शक्यता आहे. एअरबस कंपनीला भारतातील देशांतर्गत कनेक्टिव्हिटी क्षेत्रात १ हजारपेक्षा जास्त हेलिकॉप्टर विकले जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर लष्करी दले देखील आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडून हेलिकॉप्टरची मागणी करू शकतात.

भारतात कधी बनणार पहिले एअरबस हेलिकॉप्टर?

इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एअरबस हेलिकॉप्टरचे सीईओ ब्रुनो इवेन यांनी सांगितलं की, नवीन असेंबली लाईनमधून पहिले हेलिकॉप्टर हे २०२७ च्या सुरूवातीला तयार होऊन बाहेर पडण्याची शक्यता आहे. एअरबस भारतीय कंपनी टाटासोबत मिळून भारतात हेलिकॉप्टर निर्मिती करत आहे.

भारतातून लष्करी हेलिकॉप्टर निर्यात

एअरबसच्या सीईओंनी सांगितलं की, 'आम्ही आमचं टार्गेट हे नागरी आणि लष्करी मार्केट डोळ्यासमोर ठेवून तयार केलं आहे. जर लष्करी मिशनसाठी जर H 125 हेलिकॉप्टर निवडण्यात जास्त रस दाखवत आहेत. ते हे हेलिकॉप्टर खरेदी करू इच्छितात. त्यामुळं हे हेलिकॉप्टर आम्ही आमच्या ग्राहकांसाठी भारतात तयार न करण्याचं कोणतंच कारण नाही .

नव्या असेंबली लाईनसाठी १००० कोटीची गुंतवणूक

एअरबसच्या सीईओंनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांच्याकडून बंगळुरूमधील एक नवीन एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टम लिमिटेड प्रोडक्शन फॅसिलीटीचे मुंबईतून व्हर्चुअली उद्घाटन करण्यात आलं. या असेंबली लाईनसाठी एअरबसनं जवळपास १००० कोटी रूपये गुंतवणूक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news