

Air pollution increases in the National Capital Region
चंदीगड : वृत्तसंस्था
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने (सीआरईए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार नोव्हेंबर महिन्यात दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. गाझियाबादने या यादीत पहिले स्थान पटकावले. त्यानंतर नोएडा आणि बहादूरगडचा क्रमांक लागतो.
सीआरईएच्या नोव्हेंबर २०२५ मंथली एअर क्वालिटी स्नॅपशॉटनुसार पंजाब आणि हरियाणात शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय ८० ते ९० टक्क्यांनी घट होऊनही एनसीआरमधील २९ पैकी २० शहरांमध्ये मागील वर्षापेक्षा अधिक प्रदूषण पातळी नोंदवली गेली आहे. गाझियाबाद हे नोव्हेंबरमध्ये देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.
तिथे पीएम २५ ची सरासरी मासिक एकाग्रता २२४ पीजी/एमघन नोंदवली गेली. यामुळे त्यांनी महिन्यातील प्रत्येक दिवशी राष्ट्रीय मानकांचे उल्लंघन केले. अहवालानुसार उत्तर प्रदेशातील सहा शहरे तर हरियाणातील तीन शहरे सर्वाधिक प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये समाविष्ट आहेत.
एनसीआरमधील प्रदूषण वाढले
दिल्लीची मासिक सरासरी २.५ एकाग्रता २१५ पीजी/एमघन होती. सीआरईएचे विश्लेषक मनोज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पीक जाळण्याचा प्रभाव कमी होऊनही एनसीआरमधील प्रदूषण वाढले आहे. यामुळे वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीसारख्या वर्षभर चालणाऱ्या स्रोतांवर नियंत्रण ठेवण्याची गरज स्पष्ट होते.