Asaduddin Owaisi : 'एआयएमआयएम' भाजपची 'बी टीम' आहे का? ओवैसी म्‍हणाले, "तुम्‍हाला जर...."

आमच्‍यावर आरोप करणार्‍या राजकीय पक्षांनी स्‍वत:च्‍या कमकमुवतपणाचा आरोप करावा
Asaduddin Owaisi
'एआयएमआयएम'चे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी.File Photo
Published on
Updated on

Asaduddin Owaisi response on bjp 'B' team : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) हा राजकीय पक्ष भाजपची बी टीम आहे, असा आरोप वारंवार होत असतो. आता बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्‍हा एकदा या पक्षाने महाआघाडीशी युती न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यावरुन पुन्‍हा एकदा हाच आरोप होत असून, 'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिले आहे.

नरेंद्र मोदींना सुमारे पन्नास टक्के बिगर-मुस्लिम मते मिळतात

वृत्तसंस्‍था ANI शी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्‍हणाले की, देशातील विरोधी पक्षाला वाटत असेल की ओवैसींना प्रत्येक गोष्टीत आणल्याने आजार बरा होईल, तर मला त्यात काही अडचण नाही. माझ्‍या पक्षाला अशी कोणतीही विशिष्‍ट धारणा निर्माण करायची नाही. यापूर्वीही ही अनेकवेळा सांगितले आहे. आज पुन्हा सांगत आहोत की, " नरेंद्र मोदी तीनवेळा या देशाचे पंतप्रधान झाले यामध्‍ये भारतीय मुस्लिमांची चूक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीत सुमारे पन्नास टक्के बिगर-मुस्लिम मते मिळत आहेत. जर नरेंद्र मोदी यांना मिळणार्‍या मतांमध्‍ये बिगर-मुस्लिम टक्‍केवारी ३७-३८ इतकी असती तर माझे विरोधक मला भाजपची बी टीक असे म्‍हणू शकतले असते. यामुळे त्‍यांना माझा भाजपची बी टीम असाच राज्याभिषेक करायचा असेल तर मी ते मान्य करेन. मला काही आक्षेप नाही.र तुम्हाला वाटत असेल की ओवैसींना प्रत्येक गोष्टीत आणल्याने आजार बरा होईल, तर मला त्यात काही अडचण नाही. आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही किती कमकुवत आहात ते पाहा, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

Asaduddin Owaisi
"मोदी अन् केजरीवाल एकाच नाण्याच्या दोन बाजू" : असदुद्दीन ओवैसी

भाजप भयानक राजकीय विरोधक

राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला आहे. यावर मी त्‍यांच्‍या पक्षाच्‍या वतीने बोलणार नाही. ते सक्षम आहेत. २००९ किंवा २०१४ मध्ये माझ्या मतदारसंघातील मतदार यादीसोबत असे घडले. आम्ही गेलो आणि जिथे जिथे बोगस नोंदी होत्या. तिथे आम्ही त्यांना आव्हान दिले. आज भाजपचे लोक निवडणुका लढविताना २४ तास काम करतात. आमचे काम त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे असले पाहिजे. तुम्ही भाजपशी स्पर्धा करत आहात; हा भयानक राजकीय विरोधक आहे. आपण सतर्क राहिले पाहिजे. आणि आपण मतदार यादी तपासली पाहिजे, नावे तपासली पाहिजेत, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत आम्‍ही कोणाला मतदान केले?

बिहारमधील महाआघाडीशी युती न करण्याच्या प्रश्नावर बोलताना ओवैसी म्‍हणाले, मी नाराज असल्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. आम्‍ही आमच्या पक्षाची रणनीती ठरवू. बिहारचे प्रमुख मौलाना, विद्वान, बुद्धिजीवी, डॉक्टर आणि वकील सर्व म्हणाले की ओवेसी हे करू इच्छित नाहीत. यावर मी त्‍यांना सवाल केला की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एक महिन्यापूर्वी झाली होती आणि आम्ही कोणाला मतदान केले?. आता तेच लोक पश्चात्ताप व्यक्त करत आहेत आणि म्हणत आहेत की तुमचे हेतू बरोबर आहेत."

Asaduddin Owaisi
पंतप्रधान मोदी ‘या’ दोन गोष्‍टींवर कधी बोलत नाहीत : असदुद्दीन ओवैसी

बिहारमधील मतदार यादीतील घोळ कायम

बिहारमधील मतदार यादीतील सुधाणाविषयी ओवेसी म्‍हणाले की, या प्रकरणी आमच्या पक्षाच्या वतीने, अध्यक्ष अख्तरुल इमान यांनी वैयक्तिकरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मतदार यादी सुधारणेच्‍या नावाखाली ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांनी तपासणी केली नाही. मतदानाच्या दिवशी पुन्हा गोंधळ होईल हे तुम्हाला दिसेल. 650,000 नावे वगळण्यात आली. आता, निवडणूक आयोगाने आणखी 350,000 नावे वगळली आहेत. आता, 350,000 पुन्हा तपासावे लागतील. आम्ही काय मागणी करतो याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे हेते. घाई काय होती?, असा सवालही त्‍यांनी बिहारमधील मतदार यादी सुधारणा प्रकरणी केला.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “मी अल्लाहला घाबरतो; मोदी किंवा योगीला नाही”

बिहारमधील सुमारे १९ टक्‍के मुस्‍लिमांना नेतृत्त्‍वाचा अभाव

बिहार निवडणुकीबद्दल, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, "बिहारमधील आमचा राजकीय प्रवास सीमांचलच्या भूमीपासून सुरू झाला. आम्ही म्हटले होते की सीमांचलला न्याय मिळाला पाहिजे. सीमांचल अविकसित आहे. बिहारमध्ये कुशासन आणि भ्रष्टाचार आहे; अनेक समस्या आहेत. आणि मग मुस्लिम समुदायात अलिप्ततेची भावना आहे. अलिप्ततेचा अर्थ असा आहे की प्रत्येक समुदायाला, प्रत्येक जातीला एक नेतृत्व असते, परंतु बिहारमधील सुमारे १९% मुस्लिमांना नेतृत्वाचा अभाव आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news