Ahmedabad plane crash update| वॉल स्ट्रीट जर्नल, रॉयटर्सने माफी मागावी; पायलट फेडरेशन धाडली कायदेशीर नोटीस

Ahmedabad plane crash update| अहमदाबाद विमान अपघाताचे वार्तांकन करताना मृत वैमानिकांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
Ahmedabad plane crash
ahmedabad plane crashFile Photo
Published on
Updated on

Ahmedabad plane crash update federation of indian pilots notice to WSJ and Reuters

नवी दिल्ली ः एअर इंडिया विमान अपघातासंदर्भात The Wall Street Journal (WSJ) आणि Reuters या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी पायलटच्या चुकीवर आधारित अंदाज बांधून प्रसिद्ध केलेल्या वृत्तांवर आता Federation of Indian Pilots (FIP) ने आक्षेप घेतला आहे.

FIP ने या वृत्तसंस्थांना कायदेशीर नोटीस पाठवली असून, त्यांनी दिलेल्या 'अनाधिकार व असत्य' बातम्यांबद्दल सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे.

अहमदाबाद अपघातात 260 मृत्यू

12 जून रोजी अहमदाबादजवळ झालेल्या एअर इंडिया फ्लाईट 171 च्या अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी 'कॉकपिटमध्ये झालेली गोंधळाची परिस्थिती' किंवा 'पायलटची चूक' यावर आधारित निष्कर्षांवरून वार्तांकन केले होते.

Ahmedabad plane crash
Sher AK-203 rifle | भारतीय सीमेवर आता ‘शेर’! जवानांना मिळणार 100 टक्के स्वदेशी रायफल; 800 मीटर रेंज

FIP ची तीव्र प्रतिक्रिया

FIP च्या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, "या बातम्यांनी मृत वैमानिकांची प्रतिमा मलीन केली असून, त्यांच्या कुटुंबीयांवर अनावश्यक मानसिक तणाव निर्माण केला आहे." संघटनेच्या मते, या बातम्या केवळ अंदाजावर आधारित असून कोणतीही ठोस माहिती नसतानाही त्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

"ही अत्यंत बेजबाबदार पत्रकारिता आहे. या बातम्यांनी संपूर्ण वैमानिक समुदायाच्या मनोबलावरही परिणाम केला आहे." असेही नोटीसीत म्हटले आहे.

AAIB चा प्राथमिक अहवाल काय सांगतो?

Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) च्या प्राथमिक अहवालानुसार, विमान उड्डाण घेतल्यानंतर केवळ 30 सेकंदांतच दोन्ही इंजिनांचे ‘फ्युएल कंट्रोल स्विच’ 'रन' वरून 'कटऑफ' स्थितीत गेले. यामुळे इंजिनला इंधन पुरवठा थांबला आणि विमान कोसळले.

कॉकपिटमधील संभाषणानुसार, एका पायलटने इतराला विचारले की त्याने स्विच बदलले का, ज्यावर दुसऱ्या पायलटने नकार दिला.

परंतु अहवालामध्ये हे स्पष्ट नाही की हे स्विच आपोआप बदलले की मॅन्युअली कोणी बदलले. त्यामुळे अहवाल अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही.

Ahmedabad plane crash
EC on Bihar voters | बिहारमध्ये 36.86 लाख मतदार गायब! निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

अमेरिकेच्या NTSB ची सूचनाही

अमेरिकेच्या National Transportation Safety Board (NTSB) च्या प्रमुख जेनिफर होमेंडी यांनी देखील प्रसारमाध्यमांना सूचित केले की, "ही चौकशी अजून सुरू आहे. आत्ताच्या टप्प्यावर अशा बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे पूर्वग्रहदूषित आणि अपूर्ण माहितीवर आधारित निष्कर्ष मांडणे होय."

FIP ची अंतिम मागणी

FIP ने प्रसारमाध्यमांना सुचवले आहे की, AAIB चा अंतिम अहवाल येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा दोष निश्चित करणे टाळावे. तसेच त्यांनी मृत पायलट्सबद्दल असंवेदनशील बातम्यांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news