Air India Plane Crash Report : विमानाने उड्डाण केले आणि कोसळले...जाणून घ्‍या अपघात होण्‍यापूर्वी प्रत्‍येक सेकंदाला काय घडलं?

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने प्रसिद्ध केला आहे.
Air India Plane Crash Report
अहमदाबाद विमान अपघात.File Photo
Published on
Updated on

Ahmedabad Plane Crash Report : १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे या दुर्घटनेची आतापर्यंतची सर्वात तपशीलवार माहिती समाेर आली आहे.या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच दोन्ही इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच एका सेकंदाच्या अंतराने 'RUN' स्थितीवरून 'CUTOFF' स्थितीत आले होते. जाणून घेवूया अहवालात नमूद केलेली अपघातापूर्वीच्या प्रत्‍येक सेकंदाचा घटनाक्रम.... (कसांत वेळ)

विमान नवी दिल्लीहून अहमदाबादमध्ये उतरले...

१२ जून २०२५ : सकाळी ११:१७: एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान VT-ANB, फ्लाईट क्रमांक AI423 विमान नवी दिल्लीहून अहमदाबादमध्ये उतरले.

( दुपारी १ : १८: ३८) : विमान विमानतळावरील 'बे ३४' मधून बाहेर पडताना दिसले.

( १: २५ : १५ ) : विमान कर्मचाऱ्यांनी टॅक्सीसाठी (taxi) परवानगी मागितली. हवाई वाहतूक नियंत्रणाने (एटीसी) परवानगी दिली. विमान टॅक्सीवे आर4 मार्गे धावपट्टी 23 कडे जाऊ लागले. उड्डाणासाठी सज्ज झाले.

( १ : ३२ : ०३) : विमानाचे नियंत्रण ग्राउंड कंट्रोलकडून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित झाले.

विमानाला टेक-ऑफसाठी (उड्डाणासाठी) परवानगी

(१ : ३७ :३३) : विमानाला टेक-ऑफसाठी (उड्डाणासाठी) परवानगी देण्यात आली.

(१: ३७ : ३७) : विमानाने धावपट्टीवरून वेग घेण्यास सुरुवात केली (टेक-ऑफ रोल).

(१ : ३८ :३९) : विमानाने जमिनीवरून हवेत झेप घेतली (लिफ्ट-ऑफ). तपास अधिकाऱ्यांच्या मते, एअर/ग्राउंड सेन्सर्स 'एअर मोड'मध्ये गेल्‍याने टेक-ऑफ झाल्याचे दर्शवते.

(१: ३८: ४२) : विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. यानंतर तत्‍काळ विमानाचे इंजिन १ आणि इंजिन २ चे इंधन कटऑफ स्विच एका सेकंदाच्या अंतराने 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत गेले.

अहवालानुसार, इंजिनांना होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे, इंजिन N1 आणि N2 ची गती टेक-ऑफच्या मूल्यांवरून कमी होऊ लागली. याचवेळी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांमधील गोंधळ स्पष्टपणे ऐकू येतो. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले, "तुम्ही स्विच कटऑफ का केले?" यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले की, "मी केले नाही."विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, टेक-ऑफनंतर लगेचच, रॅम एअर टर्बाइन (RAT) कार्यान्वित झाले. "विमानतळाची सीमा भिंत ओलांडण्यापूर्वीच विमानाची उंची कमी होऊ लागली होती," असे तपासात नमूद केले आहे.

( १: ३८: ४७) : दोन्ही इंजिनांची गती किमान आयडल स्पीडच्या खाली गेली. RAT च्या हायड्रॉलिक पंपाने हायड्रॉलिक पॉवर पुरवण्यास सुरुवात केली.

( १ : ३८ :५२) : इंजिन १ चा इंधन कटऑफ स्विच 'CUTOFF' वरून पुन्हा 'RUN' स्थितीत आणला गेला.

( १ : ३८ :५६ ) : इंजिन २ चा स्विचही 'RUN' स्थितीत रिसेट करण्यात आला.

Air India Plane Crash Report
Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या ब्लॅक बॉक्स विश्लेषणात संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांना सामील करण्यास भारताचा नकार

तपास अहवालातील ठळक मुद्दे

"विमान हवेत असताना इंधन नियंत्रण स्विच 'CUTOFF' वरून 'RUN' स्थितीत आणले जातात, तेव्हा प्रत्येक इंजिनचे फुल अथॉरिटी डिजिटल इंजिन कंट्रोल (एफआयडीईसी) स्वयंचलितपणे इग्निशन आणि इंधन पुरवठा पुन्हा सुरू करून इंजिन रि-लाइट (पुन्हा सुरू) करण्याची आणि थ्रस्ट रिकव्हरीची प्रक्रिया सांभाळते."

इंजिन १ ची गती कमी होणे थांबले आणि ते पुन्हा पूर्ववत होऊ लागले.इंजिन २ पुन्हा सुरू (रि-लाइट) होऊ शकले, परंतु गती कमी होण्यावर नियंत्रण मिळवू शकले नाही आणि वेग वाढवण्यासाठी वारंवार इंधन पुरवठा करत राहिले.

( १ : ३९ : ०५) एका वैमानिकाने "मे-डे, मे-डे, मे-डे" (MAYDAY, MAYDAY, MAYDAY) असा आपत्कालीन संदेश दिला.

(१: ३९ : १ १ ) : विमानाच्या डेटा रेकॉर्डिंगची नोंद थांबली.

( १: ४४ :४४) : अपघातस्थळी बचाव आणि मदतकार्यासाठी विमानतळावरून अग्निशमन दलाची वाहने रवाना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news