

चिकोडी : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एआय-१७१ प्रवासी विमान कोसळले, त्यात कर्नाटकातील सह-वैमानिकाचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. क्लाईव्ह कुंदर असे मयत सह वैमानिकाचे नाव आहे. मूळचे कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील असलेले क्लाइव्ह कुंदर मुंबईत राहत होते.
पायलट कुंदर हे फर्स्ट ऑफिसर म्हणून काम करत होते. पायलट कुंदर यांना ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. कुंदर हे या अपघात झालेल्या एअर इंडियाच्या अल-१७१ विमानाचे को-पायलट होते. विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविकला जात असताना दुपारी 1:38 वाजता उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघनीनगरजवळ बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये दोन वैमानिक आणि १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता.