Ahmedabad plane crash : पाहणी दौऱ्याचं रिल्स टाकल्याने केंद्रीय मंत्र्यांवर टीका; नेटीझन्स म्हणाले, हे तर Influencer Culture

viral video | अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली असताना, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचा घटनास्थळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
Ahmedabad plane crash viral video
Ahmedabad plane crash viral video file photo
Published on
Updated on

Ahmedabad plane crash viral video |

नवी दिल्ली : गुजरातची राजधानी अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान एका रूग्णालयाच्या होस्टेलवर कोसळले. त्यात २६१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी पाहणी आणि मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठलीये. घटनास्थळावर पाहणी करतानाचा व्हिडिओ नायडूंनी शेअर केला आहे. रिल्स फॉर्मेटमध्ये शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटीझन्सनी टीका केली आहे. ही तर इन्फ्लुएन्सर संस्कृती झाली, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. (Ahmedabad plane crash)

केंद्रीय मंत्री राम मोहन रायडूंनी कधी व्हिडिओ शेअर केला?

या गंभीर आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. विजयवाडाहून अहमदाबादला पोहोचल्यानंतर नायडू यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. रात्री उशिरा त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, या गंभीर घटनेच्या व्हिडिओला लावलेले पार्श्वसंगीत (म्युझिक) आणि व्हिडिओ एडिटिंग यावर अनेकांनी आक्षेप घेतला.

Ahmedabad plane crash viral video
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत 261 ठार, एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला

हे नाटक कशासाठी? सोशल मीडियावर ट्रोल

एका विनाशकारी अपघाताच्या ठिकाणी, जिथे शेकडो निष्पाप जीवांचा अंत झाला, अशा ठिकाणच्या व्हिडिओला संगीत लावणे हे अत्यंत असंवेदनशील आणि दुःखद घटनेचे गांभीर्य कमी करणारे असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून 'अरे २००-४०० लोक मरत राहतील, सहानुभूती-जबाबदारी-न्याय हे सगळं बकवास आहे, आधी माझी रील बनवा,' असे एका वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टला उद्देशून लिहिले आहे. 'एका मंत्र्याचे दयनीय वर्तन... शून्य जबाबदारी असलेली प्रभावशाली संस्कृती', 'हे नाटक कशासाठी? रील्स बनवणे आणि एडिटिंग करणे घृणास्पद आहे. फक्त तुमचे काम करा. जाहिराती करणे आणि अशा गोष्टी पोस्ट करणे थांबवा. हे रील्स बनवणे खरोखर आवश्यक आहे का? ही काळाची गरज आहे का?' अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टला दिल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news