

Agra Crime News:
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका मंदिरात ५ वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केले. तिच्या ओरडण्या ऐकून आजी पोहोचली, मात्र तिला धक्का देत नराधम पसार झाला. पोलिसांनी प्रथम संबंधित तरुणाला मानसिकदृष्ट्या विकृत म्हणत सोडून दिले. मात्र या सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर चिमुरडीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
१८ मे रोजी पाच वर्षांची मुलगी घराजवळील मंदिराजवळ खेळत होती. शेजारचा तरुण पवित्रा उर्फ पम्मी तिथे आला. त्याने मुलीला आमिष दाखवून मंदिरात घेऊन गेला. निष्पाप मुलीला मंदिरात नेल्यानंतर आरोपी तरुणाने घृणास्पद कृत्य केले. चिमुरडीने ओरडायला सुरुवात केली. हा आवाज ऐकून पीडित मुलीची आजी तिथे पोहोचली. आजीला धक्का देत आरोपी पसार झाला हाेता. मुलीची अवस्था पाहून आजीने आरडाओरडा केला. स्थानिक लोकांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची नोंद जगदीशपुरा पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, प्रथम पोलिसांनी आरोपीला मानसिकदृष्ट्या विकृत म्हणून असल्याचे सांगितले. यानंतर त्याला तत्काळ सोडून दिले. सोमवारी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी तरुणाला पाेलिसांनी पुन्हा ताब्यात घेले. कुटुंबाच्या तक्रारीवरून नराधम पवित्रा उर्फ पम्मी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मानसिकदृष्ट्या विकृत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असे पाोलिसांनी म्हटले आहे. मात्र पाेलिसांनी अत्यंत असंवेदनशील प्रकार हे प्रकरण हाताळल्याने स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.