अमेठीतील विजयानंतर किशोरीलाल शर्मा सोनिया गांधींच्या भेटीला

अमेठीतील विजयानंतर किशोरीलाल शर्मा सोनिया गांधींना भेटले
अमेठीतील विजयानंतर किशोरीलाल शर्मा सोनिया गांधींना भेटले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अमेठीत विजय साकारणारे गांधी घराण्यातील विश्वासू सहकारी किशोरीलाल शर्मा यांनी बुधवारी नवी दिल्लीत येऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी भेट घेतली.

भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करून शर्मा विजयी झाले. या विजयाबद्दल सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, प्रियांका गांधी वधेरा यांनी शर्मा यांचे अभिनंदन केले.

गेली ४० वर्षे अमेठी व रायबरेलीत गांधी घराण्याचे प्रतिनिधी म्हणून काम सांभाळणारे किशोरीलाल  शर्मा यांना अमेठीत उमेदवारी देऊन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता. तो त्यांनी सार्थ ठरविला.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news