आदित्य एल-1 चे चौथ्यांदा कक्षांतर

आदित्य एल-1 चे चौथ्यांदा कक्षांतर

बंगळूर, वृत्तसंस्था : आदित्य एल-1 यानाची कक्षा इस्रोने 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता चौथ्यांदा वाढविली. कक्षांतरासाठी काही काळ थ्रस्टर्स फायर करण्यात आले. पृथ्वीपासून यानाचे किमान अंतर आता 256 कि.मी., तर कमाल अंतर 1 लाख 21 हजार 973 कि.मी. आहे.

इस्ट्रॅक बंगळूर येथून हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. मॉरिशस आणि पोर्ट ब्लेअरमधील इस्रोच्या ग्राऊंड स्टेशन्सवरून उपग्रहाचा मागोवाही घेण्यात आला.

आता 19 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता पाचव्यांदा थ्रस्टर फायर होईल. याआधी 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी कक्षा यानाची पृथ्वीभोवतीची वाढवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news