Adani AI Data Center Investment: अदानींची 100 अब्ज डॉलर्सची एआय डेटा सेंटर गुंतवणूक; 2035 पर्यंत हरित ऊर्जेवर ‘हायपरस्केल’ भारताचा संकल्प

5 गिगावॅट क्षमतेचे जागतिक दर्जाचे एकात्मिक प्लॅटफॉर्म; भारतात 250 अब्ज डॉलर्सच्या एआय इको-सिस्टीमचा दावा
Adani Group
Adanipudhari photo
Published on
Updated on

एआय डेटा सेंटर गुंतवणूक जाहीर

2035 पर्यंत हरित ऊर्जेवर आधारित हायपरस्केल प्रकल्प उभारण्याचा रोडमॅप

भारतात 250 अब्ज डॉलर्सची एआय इको-सिस्टीम उभारण्याचा दावा

Adani Group
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी; राष्ट्रवादी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

क्लाऊड प्लॅटफॉर्म आणि पूरक उद्योगांमध्ये अतिरिक्त 150 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची शक्यता

5 गिगावॅट क्षमतेचे जगातील सर्वात मोठे एकात्मिक डेटा सेंटर प्लॅटफॉर्म

उच्च कार्यक्षमता एआय वर्कलोडसाठी दुसरे एआय डेटा सेंटर विकसित करण्यावरही सहकार्य सुरू

Adani Group
Mumbai Climate Week: हवामान बदलाच्या लढाईत महाराष्ट्र अग्रभागी; ‘क्लायमेट वीक’मधून ठोस दिशा

नवी दिल्ली : अदानी समूहाने मंगळवारी 100 अब्ज डॉलर्सची भव्य गुंतवणूक जाहीर करत 2035 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेवर चालणारी, हायपरस्केल आणि एआय-रेडी डेटा सेंटर उभारण्याचा संकल्प जाहीर केला. जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जाकम्प्युट क्षमतेच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार असल्याचा दावा समूहाने केला आहे.

समूहाच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राईझेसने दिलेल्या निवेदनानुसार, या उपक्रमामुळे सर्व्हर उत्पादन, क्लाऊड प्लॅटफॉर्म आणि पूरक उद्योगांमध्ये अतिरिक्त 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात सुमारे 250 अब्ज डॉलरचा एआय पायाभूत सुविधा इको-सिस्टीम तयार होईल.

Adani Group
Mumbai Metro 4 Accident: मुलुंड अपघातानंतर सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी

समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले की, ‌‘जग एका अशा बुद्धिमत्ता क्रांतीत प्रवेश करत आहे, जी मागील कोणत्याही औद्योगिक क्रांतीपेक्षा अधिक व्यापक आहे. ऊर्जा आणि कम्प्युट यांचा समतोल साधणारी राष्ट्रे पुढील दशक घडवतील.‌’ भारत या शर्यतीत आघाडी घेण्यास सक्षम असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Adani Group
Nashik Tapovan Tree Cutting: तपोवनातील १८०० झाडांच्या कत्तलीवर हायकोर्ट संतप्त; पालिकेला झाप

5 गिगावॅट डेटा सेंटर क्षमतेचे लक्ष्य

सध्या अदानीकडे 2 गिगावॅट राष्ट्रीय डेटा सेंटर प्लॅटफॉर्म आहे. तो 5 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोबत, विशाखापट्टणम येथे गिगावॅटस्तरीय एआय डेटा सेंटर कॅम्पस उभारण्याचा करार झाला असून, सोबत हैदराबाद आणि पुणे येथे अशाच सुविधा उभारल्या जाणार आहेत. याशिवाय, सोबत उच्च-कार्यक्षमता एआय वर्कलोडसाठी दुसरे एआय डेटा सेंटर विकसित करण्यावरही सहकार्य सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news