नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
अतिशी यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले. अतिशी यांच्याकडे सर्वाधिक १३ खाती तर सौरभ भारद्वाज यांच्याकडे ८ खाती आहेत. मुख्यमंत्री अतिशी यांच्याकडे महसूल, वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, वीज, शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षण, जनसंपर्क, सेवा, दक्षता, पाणी पुरवठा, विधी-न्याय आणि विधिमंडळ कामकाज आणि इतर कोणत्याही मंत्र्याला नस दिलेली खाती अतिशी यांच्याकडे आहेत. सौरभ भारद्वाज यांच्याकडे शहरी विकास, सिंचन आणि पूर नियंत्रण, आरोग्य, उद्योग, कला-संस्कृती आणि भाषा, पर्यटन, समाज कल्याण, सहकार ही खाती आहेत.
एक नजर दिल्ली 'सरकार'वर
अतिशी दिल्लीच्या आजवरच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री
अतीशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री
सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नाही
मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक १३ खाती
मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल ८ खाती सौरभ भारद्वाज यांच्याकडे
त्यानंतर गोपाल राय यांच्याकडे सामान्य प्रशासन, विकास, पर्यावरण, वन आणि वन्यजीव ही खाती आहेत. तर कैलास गेहलोत यांच्याकडे वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती आणि तंत्रज्ञान, गृह, महिला आणि बाल विकास मंत्रालय देण्यात आले आहे. इम्रान हुसेन यांच्याकडे अन्न आणि पुरवठा, निवडणूक विभाग तर नवे मंत्री असेलेल मुकेश अहलावत यांच्याकडे गुरुद्वारा निवडणुका, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, जमीन आणि इमारत, श्रम, रोजगार ही खाती देण्यात आली आहेत.