अतिशी यांच्या मंत्रिमंडळात मुकेश अहलावत यांचा समावेश 

दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ७ सदस्य
Delhi New CM
दिल्‍लीच्‍या शिक्षण मंत्री आतिशी. ( संग्रहित छायाचित्र ) File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा -

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या अतिशी मार्लेना २१ सप्टेंबरला शपथ घेणार आहेत. अतिशी आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हा नवा चेहरा असेल, अशी माहिती आम आदमी पक्षाने गुरुवारी दिली.

सातव्या सदस्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही

मुकेश हे सामाजिक न्याय मंत्री राज कुमार आनंद यांची जागा घेतील असे 'आप'ने म्हटले आहे. ते दिल्लीतील सुलतानपूर माजरा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते आम आदमी पक्षाचा (आप) दलित चेहरा आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ७ सदस्य आहेत. फेब्रुवारी २०२५  मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुका होणार असल्याने नवीन मुख्यमंत्री आणि नवीन मंत्र्यांचा कार्यकाळ कमी असेल. गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे मंत्रिमंडळात मंत्री राहतील. सातव्या सदस्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्याच दिवशी केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता. तर २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news