Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता आधार ओटीपी अनिवार्य; 1 जुलैपासून IRCTC चे नवे नियम वाचा

Tatkal Ticket Booking: IRCTCचे नवीन नियम; जुलैपासून अंमलबजावणी, AC आणि नॉन-AC वर्गांसाठी विशेष नियम
Screenshot of the IRCTC mobile app for train ticket booking, overlaid on an image of a train, with Marathi text indicating new reservation rules.
IRCTC Reservation New Rule July 1, 2025Pudhari
Published on
Updated on

IRCTC Tatkal Ticket Booking rule changes 1 July 2025

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल करत आहे, जे पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना संधी देण्यासाठी केले आहेत.

जुलै 2025 पासून, तात्काळ तिकीट ऑनलाइन बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येणार आहे. याशिवाय, आरक्षण काउंटरवर आणि अधिकृत एजंट्सकडून तिकीट बुक करताना ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) प्रमाणीकरण लागू होईल.

एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांत बुकिंग करण्यावर बंदी असेल, जेणेकरून सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल.

Screenshot of the IRCTC mobile app for train ticket booking, overlaid on an image of a train, with Marathi text indicating new reservation rules.
TasteAtlas Top 50 Breakfasts | महाराष्ट्राच्या मिसळचा जगात झणझणीत सन्मान; 'टॉप 50 ब्रेकफास्ट'च्या यादीत 'या' स्थानावर एंट्री

नवीन तत्काळ तिकीट बुकिंग नियम काय आहेत?

ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक: जुलै 2025 पासून IRCTC च्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार नंबर लिंक करणे आणि यशस्वी प्रमाणीकरण करणे अनिवार्य होणार आहे.

ओटीपी प्रमाणीकरण: 15 जुलै 2025 पासून तिकीट बुक करताना ऑनलाइन, काउंटरवर तसेच अधिकृत एजंट्सकडून ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक होईल.

एजंट्ससाठी वेळेची बंदी: अधिकृत एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत तिकीट बुक करण्यास मनाई असेल:

AC वर्गासाठी: सकाळी 10:00 ते 10:30

नॉन-AC वर्गासाठी: सकाळी 11:00 ते 11:30

Screenshot of the IRCTC mobile app for train ticket booking, overlaid on an image of a train, with Marathi text indicating new reservation rules.
China Thanks Indian Navy | चीनला मानावे लागले भारतीय नौदलाचे आभार; समुद्रात त्या रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

प्रवाशांनी काय करावे?

  1. आपल्या IRCTC युजर प्रोफाईलमध्ये आधार नंबर लिंक करा आणि प्रमाणीकरण पूर्ण करा.

  2. तत्काळ तिकीट बुक करताना ओटीपीसाठी मोबाईल नंबर अपडेट ठेवा.

  3. एजंट्स किंवा काउंटरवर तिकीट बुक करताना ओटीपीवर लक्ष ठेवा.

Screenshot of the IRCTC mobile app for train ticket booking, overlaid on an image of a train, with Marathi text indicating new reservation rules.
Priyanka Gandhi | प्रियांका गांधी अडचणीत? केरळ हायकोर्टाने पाठवली नोटीस; वायनाडमध्ये 4 लाख मतांनी विजय, पण कोर्टात खरी परीक्षा...

IRCTC तात्काळ तिकीट कसे बुक करावे?

  1. IRCTC वेबसाइट (https://www.irctc.co.in/nget/train-search) किंवा मोबाइल ॲपवर लॉगिन करा.

  2. प्रवासाची स्टेशन (From - To), तारीख आणि प्रवास वर्ग निवडा.

  3. को पर्यायामध्ये ‘तत्काळ’ निवडा. उपलब्ध ट्रेन्स तपासा आणि प्रवास वर्ग निवडा.

  4. “बुक नाऊ” बटणावर क्लिक करा.

  5. प्रवाश्यांचे नाव, वय, लिंग, आसन प्राधान्य व खाद्य पर्याय भरा.

  6. तपासणी कोड आणि मोबाईल नंबर टाका. पुढे ‘कंटिन्यू’ बटणावर क्लिक करा.

  7. तिकीट तपशील व भाडे तपासा आणि ‘पमेंट’ पानावर जा.

  8. आपली पेमेंट पद्धत निवडा आणि पेमेंट करा.

  9. यशस्वी झाल्यावर तिकीट पुष्टी पान व SMS प्राप्त होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news