कानपूरनंतर अजमेरमध्येही रेल्वे अपघाताचा कट! रुळावर ठेवले सिमेंटचे ब्लॉक्स

Rajasthan | रु‍ळावर दोन सिमेंट ब्लॉक्स ठेवून अपघाताचा प्रयत्न
Rajasthan, Ajmer
राजस्थानच्या अजमेरमध्ये रुळावर सापडले ७० किलो वजनाचे दोन सिमेंट ब्लॉक्स. (Photo- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रेल्वे अपघात घडवून आणण्याचा पुन्हा एक कट उघड झाला आहे. अज्ञातांनी राजस्थानच्या (Rajasthan) अजमेरमध्ये (Ajmer) रेल्वे रुळावर प्रत्येकी ७० किलो वजनाचे दोन सिमेंट ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुदैवाने सिमेंटच्या ब्लॉकला धडक बसूनही रेल्वे गाडीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला.

फुलेरा-अहमदाबाद मार्गावरील वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या सरधना आणि बांगड स्थानकांदरम्यान रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. कुणीतरी रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवला असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदर ब्लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, याच रुळावर पण काही अंतरावर दुसरा ब्लॉकही आढळून आला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

कालिंदी एक्स्प्रेस' उडविण्याचा कट, सिलिंडरला रेल्वेची धडक

कानपूरमध्येही रेल्वे उडविण्याचा कट उघड झाला आहे. अनवर-कासगंज मार्गावर सिलिंडर (LPG cylinder) ठेवण्यात आले होते. ‘कालिंदी एक्स्प्रेस’ (Kalindi Express train) या सिलिंडरला धडकली; पण सिलिंडरचा स्फोट झाला नाही. सिलिंडर रुळावरून फेकला गेला. रेल्वेच्या लोको पायलटने याबाबत त्वरित वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले. आरपीएफ, जीआरपी, रेल्वेने परिसराची तपासणी केली. सोमवारी आयबी, एसटीएफ, एटीएस, एनआयएचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पेट्रोल, काडेपेटी, दारूगोळासदृश्य पदार्थ सापडले

रुळालगत सिलिंडरशिवाय पेट्रोल, काडेपेटी, मिठाईचा डबा तसेच दारूगोळासदृश्य पदार्थ आढळून आले आहेत. दहशतवादी कटाची शक्यता सर्वच यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे. तपासासाठी ६ पथके स्थापन करण्यात आली आहेत.

दहशतवादी कट असल्याची शंका?

इथे जवळच एक मजार आहे. देशभरातून इथे जमाती येत असतात. त्यांच्या आडून दहशतवादीही येत असावेत, असा कयास आहे. कारण दुसर्‍यांदा असा प्रकार घडलेला आहे, असे पोलिस उपायुक्त राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.

Rajasthan, Ajmer
मनमाड - इंदूर रेल्वे मार्गासाठी 18 हजार कोटी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news