गुजरातमधील साबरकांठा येथे कार-ट्रकचा भीषण अपघात; ७ ठार

Gujarat Accident | हिम्मतनगरजवळ अपघात
accident at Sabarkantha in Gujarat
गुजरातमधील साबरकांठा येथे कार-ट्रकचा भीषण अपघात; ७ ठार file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहीती मिळत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

शामलाजीहून अहमदाबादच्या दिशेने येणारी भरधाव कार ट्रकच्या मागील बाजूस धडकली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसली तरी मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश अहमदाबादमधील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news