पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा जम्मूतील रुग्णालयात मृत्यू

Pulwama terror attack : आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Pulwama terror attack
पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा जम्मूतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

२०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ला (Pulwama terror attack) प्रकरणातील ३२ वर्षीय आरोपीचा जम्मूतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने श्रीनगर येथील काश्मीर डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हाजीबल काकापोरा येथील रहिवासी असलेल्या बिलाल अहमद कुचाय याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जम्मूतील सरकारी वैद्यकीय इस्पितळात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ५ जुलै २०२० पासून किश्तवाडमधील जिल्हा कारागृहात मुक्काम होता.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी जम्मूतील सरकारी वैद्यकीय इस्पितळात येथे हलविण्यापूर्वी कुचाय याच्यावर जिल्हा कारागृह किश्तवाडच्या वैद्यकीय युनिटमध्ये उपचार करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान काल रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. कुचायला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.

बिलाल अहमद कुचाय याच्यावर २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या प्रकरणी कुचायला जुलै २०२० मध्ये अटक करण्यात आली होती.

कोण आहे बिलाल अहमद?

एनआयएने पुलवामा हल्ला प्रकरणी सातवा आरोपी म्हणून बिलाल अहमद याला जुलै २०२० मध्ये अटक केली होती. बिलाल अहमद याच्या मोबाईलवरून पुलवामा हल्ल्याचा आत्मघाती हल्लेखोर आदिल डारचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. त्याच्यावर दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत पुरविल्याचा आरोप आहे. पुलवामा हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना बिलाल अहमदने राहण्याचीही व्यवस्था केली होती. एनआयएच्या माहितीनुसार, बिलाल अहमदने दहशतवाद्यांना एक हाय फ्रिक्वेन्सी मोबाईलदेखील दिला होता. ज्याद्वारे दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये बसलेल्या सुत्रधारांशी बोलून त्यांच्याकडून पुढील घातपाताची माहिती घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news