

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन
सूरतमध्ये गॅस गळती झाल्याने ६ मजुरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमधील जीआयडीसी परिसरात ही मोठी घटना घडली आहे. येथे एका केमिकल टँकरमधून गॅस गळती झाल्याने ६ मजुरांचा मृत्यू झाला. तर २० जण गंभीर आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सूरतमध्ये जीआयडीसी भागात गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण भागात गोंधळ सुरू झाला. या भागात अनेक कंपन्या आहेत. अनेक मजूर काम करतात. श्वास घुटमळल्याने आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक लोकांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरमधून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या घटनेमागील कारणांचा तपास केला जात आहे. बचाव कार्यासाठी प्रशासनाची टीम घटनास्थऴी पोहोचली.