

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात सोमवारी दिवसभरात 37 हजार 379 रुग्णांची भर पडली. तर 124 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान 11 हजार 7 रुग्णांनी कोरोना वर मात केली. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्ती दर 98.13 टक्क्यांपर्यंत घसरला.
भारतात आता केवळ 1 लाख 71 हजार 830 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. मंगळवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्ग दर 3.24 टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्ग दर 2.05 टक्के होता. देशात 1 कोटी डोस सोमवारी दिले गेले.
मंगळवारी ओमायक्रॉन बाधितांची संख्या 1 हजार 892 पर्यंत पोहोचली. यातील 766 रुग्णांनी संसर्गावर मात केली. महाराष्ट्रात 568 ओमायक्रॉनबाधित आढळले. यातील 259 रुग्णांनी संसर्गावर मात केली. दिल्लीत 382, केरळ 185, राजस्थान 174 तसेच गुजरातमध्ये 152 ओमायक्रॉनबाधित आढळले.