लष्कर प्रमुख मनोज नरवणे
लष्कर प्रमुख मनोज नरवणे

लष्करप्रमुख एम. एम. नरवणे सीओएससी अध्यक्षपदी

Published on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीओएससी) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेले पद भरण्यासाठी एक व्यवस्था म्हणून त्यांच्याकडे कार्यभार देण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकार्‍याने सांगितली.

दोन वर्षांपूर्वी सीडीएस पद निर्माण करण्यात आले. त्याआधी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद हे सर्वोच्च पद होते. सेनाप्रमुखांमध्ये जनरल एम. एम. नरवणे हे सर्वांत ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सीएससी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्‍नूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी आणि सशस्त्र दलाच्या 11 जवानांचाही मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news