Mi-17V-5 हेलिकॉप्टर : रशियन निर्मित जगातील सर्वांत हायटेक चॉपर्सपैकी एक; त्याची रचनाच भव्यदिव्यता सांगते | पुढारी

Mi-17V-5 हेलिकॉप्टर : रशियन निर्मित जगातील सर्वांत हायटेक चॉपर्सपैकी एक; त्याची रचनाच भव्यदिव्यता सांगते

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

तामिळनाडूतील कुन्नूर येथे कोसळलेले लष्कराचे हेलिकॉप्टर सामान्य नक्कीच नाही. ते Mi-17V-5 हेलिकॉप्टर होते, जे लष्करी वापरासाठी अतिशय प्रगत मानले जाते. ज्याचा उपयोग सैन्यदल आणि शस्त्रास्त्र वाहतूक, फायर सपोर्ट, एस्कॉर्ट, गस्त आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांसाठी देखील केला जातो. भारतातील अनेक VVIP वापरतात. या हेलिकॉप्टरची वैशिष्ट्येही खास आहेत.

कुन्नूरमध्ये हवाई दलाचे Mi-17V-5 अपघातग्रस्त झाले आहे. सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती आहे. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mi-17V-5 हे VIP हेलिकॉप्टर मानले जाते. ही Mi-8/17 जनरेशनच्या लष्करी वाहतुकीची एक आवृत्ती आहे. ज्यांची निर्मिती रशियन हेलिकॉप्टरची उपकंपनी असलेल्या कझान हेलिकॉप्टरने केली आहे. केबिनच्या आत आणि बाहेरील स्लिंग कार्गो वाहतुकीसाठी डिझाइन केले आहेत. Mi-17V-5 हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टरपैकी एक आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने (MoD) फेब्रुवारी 2013 मध्ये आयोजित Aero India शो दरम्यान 12 Mi-17V5 हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती. डिसेंबर 2008 मध्ये, भारतीय संरक्षण मंत्रालयाने रशियन हेलिकॉप्टर कंपनीसोबत 80 हेलिकॉप्टरसाठी $1.3 अब्जचा करार केला. भारतीय वायुसेनेला (IAF) त्याची डिलिव्हरी 2011 मध्ये सुरू झाली. ज्या अंतर्गत 2013 च्या सुरुवातीला 36 हेलिकॉप्टर आले होते.

Rosoborne Exports आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाने 2012 आणि 2013 दरम्यान पुन्हा 71 Mi-17V-5 हेलिकॉप्टरसाठी करार केले. नवीन ऑर्डर 2008 मध्ये स्वाक्षरी केलेल्या कराराचा भाग होत्या. Rosoborne Exports ने जुलै 2018 मध्ये Mi-17V-5 लष्करी वाहतूक हेलिकॉप्टरची शेवटची तुकडी भारताला सुपूर्द केली. भारतीय हवाई दलाने एप्रिल 2019 मध्ये Mi-17V-5 हेलिकॉप्टरच्या दुरुस्ती आणि देखभालीची सुविधा सुरू केली.

हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

Mi-17V-5 मध्यम-लिफ्टरची रचना Mi-8 एअरफ्रेमवर आधारित होती. या हेलिकॉप्टरने त्याच्या जुन्या मॉडेलची उत्कृष्ट कामगिरी आणि वैशिष्ट्ये कायम ठेवली. हे उष्णकटिबंधीय आणि सागरी हवामानात तसेच वाळवंटी भागात उडू शकते.

या हेलिकॉप्टरची मोठी केबिन खास आहे. ज्यामध्ये 12.5m² मीटर फ्लोअर क्षेत्र आणि 23m³ स्पेस आहे. पोर्टसाइड दरवाजा आणि मागील बाजूस जाणारा उतार सैनिक आणि मालवाहू यांना आत जाणे आणि बाहेर पडणे सोपे करते. हे हेलिकॉप्टर विस्तारित स्टारबोर्ड स्लाइडिंग दरवाजा, रॅपलिंग आणि पॅराशूट उपकरणे, सर्चलाइट, FLIR प्रणाली आणि आपत्कालीन फ्लोटेशन प्रणालीने सुसज्ज आहे.

Back to top button