Stock Market Updates | घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स, निफ्टीचा हिरव्या रंगात व्यवहार
Stock Market Updates Sensex
सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स हिरव्या रंगात परतला.file photo

पुढारी न्यूज नेटवर्क

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराची सोमवारी (दि.२४) सुरुवात घसरणीसह झाली होती. पण त्यानंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात ४०० अंकांनी घसरला होता. पण त्यानंतर सेन्सेक्सने तोटा मागे टाकत काढत हिरव्या रंगात व्यवहार सुरु केला. दुपारी १२ च्या सुमारास सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढून ७७,३०० च्यावर व्यवहार करत होता. तर निफ्टी ३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,५३० वर होता. ऑटो आणि फार्मा शेअर्समधील तेजीमुळे बाजारात रिकव्हरी झाली आहे.

Summary

बाजारातील आजची स्थिती काय?

  • सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीसह सुरुवात

  • पण दुपारच्या व्यवहारात बाजारात रिकव्हरी

  • सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढला

  • निफ्टीचा २३,५०० वर व्यवहार

  • ऑटो आणि फार्मा शेअर्स तेजीत

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला बँक आणि मेटल शेअर्समधील विक्रीमुळे दबाव राहिला. तर FMCG आणि कन्झ्यूमर ड्युरेबेल्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्सवर सन फार्मा, एम अँड एम, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढून व्यवहार करत आहेत. तर इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, ॲक्सिस बँक यांचे शेअर्स घसरले आहेत.

Stock Market Updates Sensex
Income Tax Return : ३१ जुलैपूर्वीच करा आयटीआर दाखल

निफ्टीवर सन फार्मा, एम अँड एम, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, सिप्ला, कोल इंडिया, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत.

Stock Market Updates Sensex
अर्थवार्ता

गुंतवणूकदारांना मान्सूनच्या संथ प्रगतीबद्दल चिंता

जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आहे. तसेच गुंतवणूकदार मान्सूनच्या संथ प्रगतीबद्दलही चिंतेत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २१ जूनपर्यंत पाऊस दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LTA) १७ टक्क्यांनी कमी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news