Tamil Nadu toxic liquor case : कुठे आहेत राहुल गांधी आणि खर्गे?

तामिळनाडू विषारी दारु प्रकरणी सीतारामण यांचा सवाल
Tamil Nadu toxic liquor case
तामिळनाडूमधील विषारी दारु प्रकरणी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्‍लाबोल केला. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूमधील विषारी दारु प्रकरणी आतापर्यंत ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. अनेकांवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आज (दि.२३) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल केला.

राहुल गांधी यांनी मौन बाळगले आहे..

पत्रकार परिषदेत बोलताना निर्मा सीतारामन म्‍हणाल्‍या की, तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृतांची संख्‍या ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या 200 हून अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये बहुतांश अनुसूचित जातीचे आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने एक शब्दही बोलला नाही. राज्यात विषारी दारू प्यायल्याने अनेक अनुसूचित जातीचे लोक मरण पावले आणि राहुल गांधी यांनी मौन बाळगले आहे. निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, 'ज्या राज्यात दारू विक्रीसाठी सरकारकडून दुकानांना परवाने दिले जातात, त्याच राज्यातील कल्लाकुरी शहरात विषारी दारू तयार केली जाते. अखेर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी कुठे आहेत?, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील कल्लाकुरी शहरात १९ जून रोजी विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर पोहोचली आहे. विषारी दारू प्यायल्याने प्रकृती बिघडलेल्‍या २१६ जणांना तामिळनाडूतील चार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुद्दुचेरी येथे दाखल झालेल्या 3 रुग्णांना मृत घोषित करण्यात आले. कल्लाकुर्ची मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. येथे दाखल 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सालेम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news