

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहलन भागात आज (दि.२२) सुरक्षा दलांनी घुसखोरीचा डाव हाणून पाडला. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख पटलेली नाही. यापूर्वी बुधवार, 21 जून रोजी बालमुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोघेही तश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.
2019 मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्याला दहशतवादमुक्त घोषित केले होते. सुरक्षा यंत्रणांच्या मते, पाकिस्तानी वंशाच्या परदेशी दहशतवाद्यांची संख्या सध्या स्थानिक दहशतवाद्यांपेक्षा जास्त आहे, मात्र सडतोड कारवाई करत त्यांचा खात्मा केला जात आहे.
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाची तैनाती सुरू करण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्याला यावेळी निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त कंपन्या मिळाल्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा अधिक आहेत. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर प्रथमच तैनाती, यात्रेकरूंची थांबे, लंगर आणि इतर ठिकाणी तैनात करण्याव्यतिरिक्त, ज्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी निमलष्करी दल देखील तैनात केले जात आहेत.