भाजप खासदार भर्तृहरी महताब हंगामी लोकसभा अध्यक्ष

भाजप खासदार भर्तृहरी महताब हंगामी लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेतील ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी सोशल मिडीया हँन्डल एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

किरण रिजीजू यांनी एक्सवर पोस्ट केले की, "राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेचे सदस्य भर्तृहरी महताब यांची राज्यघटनेच्या अनुच्छेद 95(1) अन्वये अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केली आहे. तसेच हंगामी अध्यक्षांच्या मदतीसाठी घटनेच्या कलम 99 अन्वये खासदार सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंह, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना नियुक्त करण्यात आले. 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष निवडीपर्यंत भर्तृहरी महताब यांच्यासह ते कामकाज पाहतील आणि महताब यांना मदत करतील."

कोण आहेत भर्तृहरी महताब?

भर्तृहरी महताब हे ओडिसातून सातव्यांदा लोकसभेचे खासदार आहेत. ओडिशाच्या राजकारणातील ते प्रमुख नेते आहेत. महताब यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्चमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी ते बिजू जनता दलामध्ये होते. 2017 मध्ये त्यांना लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news