UGC NET 2024 |यूजीसी-नेट परीक्षा पुन्हा घेणार, पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे

UGC NET 2024 |यूजीसी-नेट परीक्षा पुन्हा घेणार, पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने यंदाच्या नेट परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आल्याचेही म्हटले आहे. दरम्यान पुन्हा UGC-NET परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) ने दिलेल्या इनपुटनुसार यंदाच्या UGC-NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NEET प्रमाणे, UGC NET परीक्षा देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते.

'या' प्रकरणाचा तपास CBI कडे

परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या इनपुटच्या आधारावर UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे, जे प्रथमदर्शनी सूचित करते की परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली आहे. नवीन परीक्षा घेतली जाईल, ज्यासाठी माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.

UGC NET 2024: विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शासन कटिबद्ध

शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, 'यूजीसी नेट परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नेट परीक्षा फसवणुकीसाठी जबाबदार व्यक्ती किंवा संस्था आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

९ लाख उमेदवारांनी दिली होती परीक्षा

पात्र उमेदवारांना असिस्टंट प्रोफेसर, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरवणारी यूजीसी-नेट परीक्षा  ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने(NTA) देशभरात एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेतली होती. या परीक्षेला देशभरातून सुमारे ९ लाख उमेदवार बसले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news