धक्कादायक! Amazonचं पार्सल उघडताच बाहेर आला कोब्रा

धक्कादायक! Amazonचं पार्सल उघडताच बाहेर आला कोब्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहेत. ऑनलाईन शॉपिंगसाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. यामध्ये अॅमेझॉन कंपनी सेवेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कधी कधी ऑनलाईन शॉपिंगचा पश्चाताप आपल्याला सहन करावा लागतो. अशीच एक घटना बंगळुर घडली आहे.

Amazon ही कंपनी आपल्या ऑनलाईन शॉपिंग सेवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंगळुरमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याला ऑनलाईन शॉपिंगमुळे भीतीदायक अनुभव आला आहे. त्यांनी ऑर्डर दिलेल Amazon चं पार्सल आलं आणि त्यातून चक्क विषारी साप बाहेर आला. हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली. ज्या दाम्पत्याने पार्सल मागवलं होतं ते दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी अॅमेझॉनवरून एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र, जेव्हा त्याचं पार्सल आलेतेव्हा त्यात चक्क साप निघाला. कोब्रा या जातीचा हा साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली. हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही.

दाम्पत्याने केला घटनेचा व्हिडिओ

धक्कादायक प्रकारानंतर बंगळुरुतल्या इंजिनिअर जोडप्याने याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी सांगितलं की, आम्ही अॅमेझॉनवर एक्सबॉक्स कंट्रोलरची ऑर्डर दिली होती. पार्सल आल्यानंतर त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत, ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितलं असं या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

या घटनेसाठी कोण जबाबदार?

व्हिडिओत महिलेने सांगितल की, "सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने आम्हाला काहीही इजा केली नाही. आम्ही याबाबत कंपनीला म्हणजेच अॅमेझॉनला संपर्क केला. त्यावेळी ग्राहक सेवेच्या अधिकाऱ्यांनी काही काळ तुम्हीच प्रसंग सावरून घ्या. त्यामुळे साप असलेला बॉक्स समोर ठेवत त्यावर लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर अर्ध्या रात्री आली. आम्ही जे पैसे दिले होते ते आम्हाला कंपनीने परत दिले आहेत. मात्र विषरी साप आल्याचा जो धोका होता त्याचं काय? साप कुणाला चावला असता तर जीवही जाऊ शकला असता. अॅमेझॉन कंपनीने सपशेल निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली आहे. या घटनेसाठी कोण जबाबदार आहे?" असा प्रश्न या महिलेने विचारलं आहे.

कंपनीने दिलं उत्तर

इंजिनिअर दाम्पत्याने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर अॅमेझॉन कंपनीने खेद व्यक्त केला आहे. ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे आम्हाला वाईट वाटलं. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ असं कंपनीने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news